Goa Professional League Football Tournament : एफसी गोवाचा धेंपो क्लबला धक्का

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

एफसी गोवाच्या डेव्हलपमेंटल संघाने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी धेंपो स्पोर्टस क्लबला पराभवाचा धक्का दिला.

पणजी : एफसी गोवाच्या डेव्हलपमेंटल संघाने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी धेंपो स्पोर्टस क्लबला पराभवाचा धक्का दिला.

म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झालेल्या लढतीत एफसी गोवाच्या युवा संघाने 2 - 1 फरकाने विजय नोंदविला. वासीम इनामदार याने 43व्या मिनिटास, तर लालरेमरुआता याने 63व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. धेंपो क्लबचा एकमात्र गोल डॅरेल मस्कारेन्हास याने नोंदविला. सामन्यातील शेवटची दहा मिनिटे बाकी असताना धेंपो क्लबला बरोबरीची संधी होती, पण सूरज हडकोणकरच्या फ्रीकिकवर एडविन व्हिएगसचा हेडर अचूक लक्ष्य साधू शकला नाही.

INDvsENG : दारुण पराभवानंतर पीटरसनने टीम इंडियाला डिवचलं; केलं हिंदीत ट्विट!

एफसी गोवाचा हा तीन लढतीतील दुसरा विजय ठरला. त्यांचे आता सहा गुण झाले आहेत. धेंपो क्लबला पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे तीन लढतीनंतर त्यांचे चार गुण कायम राहिले. एफसी गोवा संघ अव्वल स्थानावरील साळगावकर एफसीनंतर (9 गुण) दुसऱ्या स्थानी आहे.

स्पर्धेत बुधवारी (ता. 10) चर्चिल ब्रदर्स व पणजी फुटबॉलर्स यांच्यात म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर सामना होईल.

 

संबंधित बातम्या