एएफसी स्पर्धेत 'एफसी गोवा' चौथा गोमंतकीय संघ

FC Goa is the fourth Gomantak team in the AFC tournament
FC Goa is the fourth Gomantak team in the AFC tournament

पणजी : आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग स्पर्धेत पदार्पण करताना एफसी गोवा बुधवारी (ता. 14) ई गटात कतारच्या अल रय्यान क्लबविरुद्ध फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळेल, तेव्हा एएफसी स्पर्धेत खेळणारा चौथा गोमंतकीय फुटबॉल संघ हा मान त्यांना मिळेल.

यापूर्वी एएफसीच्या स्पर्धेत साळगावकर एफसी, चर्चिल ब्रदर्स, धेंपो स्पोर्टस क्लब या गोमंतकीय संघांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. धेंपो क्लबने 2008 मध्ये एएफसी कप स्पर्धेत उपांत्य फेरी गाठून इतिहास रचला होता. या स्पर्धेच्या शेवटच्या चार संघांत स्थान मिळविणारा पहिला भारतीय फुटबॉल हा पराक्रम धेंपो क्लबच्या नावे नोंदीत आहे. एकंदरीत चँपियन्स लीग स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळविणारा एफसी गोवा हा भारतातील पहिलाच फुटबॉल संघ आहे. 2019-20 मोसमातील आयएसएल स्पर्धेत लीग विनर्स शिल्ड जिंकून त्यांनी ही पात्रता मिळविली. (FC Goa is the fourth Gomantak team in the AFC tournament)

आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) स्पर्धेत खेळणारा पहिला गोमंतकीय फुटबॉल संघ हा मान साळगावकर एफसीने मिळविला आहे. 1989-90 मध्ये ते एशियन क्लब चँपियनशिप स्पर्धेत खेळले होते, त्यानंतर 1990-91 मध्येही याच स्पर्धेत त्यांचे आव्हान प्राथमिक फेरीत आटोपले. याशिवाय साळगावकर एफसी संघ 1998-99 मध्ये एशियन कप विनर्स कप स्पर्धेत, तर 2012 मध्ये एएफसी कप स्पर्धेत खेळला होता.

चर्चिल ब्रदर्स संघ 1997-98 मोसमातील एशियन क्लब चँपियन्सशिप स्पर्धेच्या पहिल्या फेरीत खेळला होता. नंतर 2002-03 मोसमात एएफसी चँपियन्स लीगच्या पात्रता फेरीत चर्चिल ब्रदर्स संघ प्रथमच खेळला होता. त्यानंतर 2010 मध्ये  चर्चिल ब्रदर्स एएफसी चँपियन्स लीगच्या पात्रता प्ले-ऑफ फेरीत खेळला. याशिवाय ते 2010, 2013 व 2014 मध्ये एएफसी कपच्या प्राथमिक फेरीत खेळले.

धेंपो क्लबने 2005 मध्ये एएफसी कप स्पर्धेत पदार्पण केले. त्यानंतर 2006 मध्ये त्यांचे आव्हान प्राथमिक फेरीत आटोपल्यानंतर 2008 मध्ये उपांत्य फेरी गाठून ऐतिहासिक कामगिरी नोंदविली. 2009 व 2011 मध्ये त्यांनी एएफसी कपच्या राऊंड ऑफ 16 फेरीपर्यंत मजल गाठली होती. धेंपो क्लब एएफसी चँपियन्स लीगच्या पात्रता फेरीत दोन वेळा (2009 व 2011) खेळला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com