एफसी गोवापाशी नवा स्पॅनिश खेळाडू

एफसी गोवापाशी नवा स्पॅनिश खेळाडू
Jorge is a Gaur

पणजी

एफसी गोवा फुटबॉल संघाने आणखी दोन वर्षांसाठी २८ वर्षीय जॉर्ज ऑर्टिझ याच्याशी करार केला आहे. हा स्पॅनिश विंगर २०२२ पर्यंत गोव्यातील संघात असेल.

‘‘मी खूष आहे आणि नव्या सहकाऱ्यांना भेटण्यास उत्सुक आहे,’’ असे ऑर्टिझ याने एफसी गोवाच्या करारपत्रावर सही केल्यानंतर सांगितले. एफसी गोवा हा उत्कृष्ट संघ असून आयएसएल स्पर्धा आव्हानात्मक असल्याचे त्याने नमूद केले. आपण एफसी गोवाचे सामने पाहिले आहेतत्यांचा खेळ अतिशय उच्च दर्जाचा असतोअशी पुष्टी त्याने जोडली.

एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी ऑर्टिझचे संघात स्वागत केले आहे. एफसी गोवा संघासाठी आवश्यक असलेली गुणवत्ता त्याच्यापाशी असल्याचे प्रमाणपत्र त्यांनी नव्या करारबद्ध खेळाडूविषयी दिले. स्पेनमधील वरच्या विभागातील संघ त्याच्यासाठी इच्छुक होतेपण आम्ही त्याला मिळवू शकलो याचा आनंद वाटतो असेही रवी यांनी नमूद केले. ऑर्टिझ याच्या शैलीत वैविध्य आहे. तो पुढील चार जागांवर कोठेही खेळू शकतोत्यामुळे आमच्या आक्रमणात अतिरिक्त समतोलता येईलअसे रवी यांना वाटते.

गेटाफे युवा संघातून तयार झालेल्या ऑर्टिझ याने ॲटलेटिको माद्रिद बलिओनेसाआल्बासेटे बरेयाल ओव्हिएदो आदी संघाचे स्पॅनिश लीग स्पर्धेत खालच्या श्रेणीत प्रतिनिधित्व केले आहे. आक्रमक खेळाडू असलेल्या जॉर्ज ऑर्टिझ स्पॅनिश लीगमध्ये ॲटलेटिको माद्रिद ब  संघाचे २०१७-१८ मोसमात प्रतिनिधित्व करताना १९ सामन्यांत तीन गोल केले होते. २०१९-२० मोसमात तो स्पॅनिश द्वितीय विभागात (सेगुंडा बी) ॲटलेटिको बालेएरेस संघाकडून खेळला होता. २८ लीग सामन्यांत त्याने आठ गोल नोंदविले व तीन असिस्टची नोंद केली.

संपादन- अवित बगळे

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com