एफसी गोवाच्या आघाडीफळीत वाझकेझ

स्पॅनिश खेळाडू; दोन वर्षांचा करार, गतमोसमात केरळा ब्लास्टर्सकडून चमक
FC Goa
FC Goa

पणजी ; एफसी गोवाने आगामी मोसमासाठी आक्रमण करताना स्पॅनिश आघाडीपटू अल्वारो वाझकेझ याला संघात सामावून घेतले. त्याचा करार दोन वर्षांचा असून 2024 मधील मोसम अखेरपर्यंत असेल. (FC Goa have signed Spanish player Alvaro Vazquez for the upcoming season )

FC Goa
Ranji Trophy 2022 Final: शुभम शर्माने झळकावले शानदार शतक, पाहा कसे मारले 15 चौकार

वाझकेझ गतमोसमात आयएसएल उपविजेत्या केरळा ब्लास्टर्सकडून खेळला होता. पहिल्याच मोसमात चमकदार कामगिरी करताना त्याने आठ गोल व दोन असिस्टची नोंद केली होती. बार्सिलोना येथे जन्मलेला वाझकेझ 31 वर्षांचा असून स्पेनमधील ला-लिगा या अव्वल फुटबॉल स्पर्धेत खेळण्याचा त्याला अनुभव आहे.

FC Goa
Olympics 2036चं भारतात होणार आयोजन? रशिया मदत करण्यास तयार

एफसी गोवाच्या शैलीचा चाहता

‘एफसी गोवात रुजू होताना मला आनंद होत आहे. या क्लबचा प्रकल्प महत्त्वाकांक्षी आहे आणि त्यांची खेळण्याची शैली मला भावते. संघाचे अधिकारी, खेळाडू एदू (बेदिया) यांच्याशी माझी चर्चा झाली. त्यानुसार या संघात मी योग्य आहे याची खात्री पटली,’’ असे वाझकेझ याने एफसी गोवाच्या करारपत्रावर सही केल्यानंतर सांगितले. एफसी गोवा संघासाठी गतमोसम चांगला ठरला नाही, पण आगामी मोसमात ते निश्चित अव्वल जागी येतील, असा विश्वास त्याने व्यक्त केला. एफसी गोवा हा इंडियन सुपर लीगमधील मोठा संघ असून फातोर्डा येथे या संघासाठी खेळण्याचा अनुभव घेण्याची मनीषाही व्यक्त केली.

यशस्वी ठरण्याची खात्री : रवी

एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी स्पॅनिश आघाडीपटूचे संघात स्वागत करताना सांगितले, की ‘‘भारतात येण्यापूर्वी वाझकेझ याच्यावर संघाची नजर होती. त्याने भारतीय वातावरणाशी जुळवून घेतले आहे. त्यामुळे संधी मिळताच त्याच्यासाठी आम्ही प्राधान्यक्रम दिला. एफसी गोवाची खेळण्याची शैली त्याच्यासाठी योग्य असून तो यशस्वी ठरेल याची खात्री आहे.’’

आघाडीपटू अल्वारो वाझकेझ याच्याविषयी

- ला-लिगा क्लब आरसीडी एस्पान्यॉल यूथ संघातर्फे कारकिर्दीस सुरवात

- 2010 मध्ये एस्पान्यॉल क्लबच्या मुख्य संघात बढती, रियाल माद्रिदविरुद्ध पदार्पण, बार्सिलोना क्लबविरुद्ध पहिला गोल

- 2012 मध्ये गेटाफे क्लबशी करार, नंतर स्वॅन्सी सिटीतर्फे इंग्लिश प्रीमियर लीगचा अनुभव

- 2016 ते 2019 या कालावधीत पुन्हा एस्पान्यॉल संघात, जिम्नेस्टिक द तारागोना, रियाल झारागोझा, स्पोर्टिंग द गियॉन संघाचेही प्रतिनिधित्व

- 2011 मध्ये 20 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत, 2013 मध्ये 21 वर्षांखालील युरो करंडक स्पर्धेतील विजेत्या स्पेनचे प्रतिनिधित्व

- देश आणि क्लबतर्फे 17 वर्षांच्या फुटबॉल कारकिर्दीत 3४४ स्पर्धात्मक सामने, 80 गोल, 19 असिस्ट

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com