एफसी गोवाने वास्कोला बरोबरीत रोखले

वास्को संघाचा अनुभवी गोलरक्षक लुईस बार्रेटोच्या दक्षतेमुळे एफसी गोवा (FC Goa) संघाची आक्रमणे अपयशी
गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत शनिवारी झालेल्या एफसी गोवा (FC Goa) आणि वास्को स्पोर्टस क्लब यांच्यातील सामन्याचा क्षण
गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत शनिवारी झालेल्या एफसी गोवा (FC Goa) आणि वास्को स्पोर्टस क्लब यांच्यातील सामन्याचा क्षणDainik Gomantak

Goa: एफसी गोवा (FC Goa) डेव्हलपमेंटल संघाने गोवा प्रोफेशनल लीग (Goa Pro League) फुटबॉल स्पर्धेतील (Football Tournament) अपराजित मालिका कायम राखताना शनिवारी वास्को स्पोर्टस क्लबला (Vasco Sports Club) गोलशून्य बरोबरीत रोखले. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

अनुभवी गोलरक्षक लुईस बार्रेटो याच्या दक्ष कामगिरीमुळे एफसी गोवा संघाच्या आक्रमणांना यश मिळाले नाही. त्यामुळे माजी विजेत्यांना बरोबरीच्या एका गुणावर समाधान मानावे लागले.

गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत शनिवारी झालेल्या एफसी गोवा (FC Goa) आणि वास्को स्पोर्टस क्लब यांच्यातील सामन्याचा क्षण
एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा मिझोरामवर दणदणीत विजय

सामन्याच्या सुरवातीच्या अर्ध्या तासाच्या खेळात एफसी गोवाच्या ज्योवियल डायस व ब्रिसन फर्नांडिस यांनी वास्को क्लबच्या गोलक्षेत्रात धडक मारली होती, परंतु गोलरक्षक बार्रेटोस चकवा देणे त्यांना शक्य झाले नाही. ३६व्या मिनिटास बार्रेटोने डावीकडे झेपावत ज्योवियलचा आणखी एक प्रयत्न उधळून लावला. त्यामुळे पूर्वार्धाअखेरीस गोलशून्य बरोबरीची कोंडी कायम राहिली. सामन्याच्या शेवटच्या पंधरा मिनिटांच्या खेळात एफसी गोवाने गोलसाठी जोरदार आक्रमणे केली, परंतु लुईस बार्रेटोने एकाग्रता ढळू दिली नाही. डेल्टन कुलासो व ब्रिटो परेरा यांचे धोकादायक फटके रोखताना लुईसने सारा अनुभव पणास लावला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com