एफसी गोवासाठी लेनी ‘चाकातील महत्त्वपूर्ण दात’

Lenny
Lenny

पणजी

गोमंतकीय मध्यरक्षक लेनी रॉड्रिग्ज याला आणखी दोन वर्षांसाठी करारबद्ध केल्यानंतरतो एफसी गोवाच्या चाकातील महत्त्वपूर्ण दात’ असल्याचे नमूद करत संघाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी या अनुभवी खेळाडूची उपयुक्तता अधोरेखित केली.

सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दोन मोसम ३३ वर्षीय लेनी एफसी गोवा संघाचा मध्यफळीतील हुकमी आधारस्तंभ होता. आता २०२२ पर्यंत तो या संघात असेलगोव्यातच खेळून व्यावसायिक निवृत्ती त्याला शक्य असेलकदाचित तो त्यापेक्षा जास्त काळ खेळू शकतो. एफसी गोवाच्या ड्रेसिंग रुममध्ये लेनी नवोदितांसाठी प्रेरक असेल हे नक्की.

सेंट्रल मिडफिल्डर असलेला लेनी एफसी गोवातर्फे तो मागील दोन मोसम सर्व सामने (४१) खेळला. त्यापूर्वी बंगळूर एफसीकडून खेळताना तो संघाचा महत्त्वाचा दुवा ठरला होता. आयएसएल स्पर्धेतील आतापर्यंतचे सहाही मोसम लेनी खेळला आहे. पहिले तीन मोसम त्याने पुणे सिटी एफसीचे प्रतिनिधित्व केले.

लेनीने गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत दोन गोल नोंदवून गोल स्कोअरिंग’ क्षमताही सिद्ध केली. बंगळूर एफसी संघात असताना तो एएफसी कप स्पर्धेत खेळला आहे. गतमोसमात एफसी गोवाने आयएसएल लीग विनर्स शिल्ड जिंकून एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेसाठी पात्रता मिळविली. लेनीच्या कारकिर्दीत आगामी मोसमात ही महत्त्वाची स्पर्धा असेल. नव्या मोसमात त्याला एफसी गोवाचे नवे स्पॅनिश प्रशिक्षक ह्वआन फेरॅन्डो यांच्या शैलीशीही जुळवून घ्यावे लागेल.

 विजयी कामगिरी

लेनीने बंगळूर (२०१८) व एफसी गोवा (२०१९) संघात असताना दोन वेळा सुपर जिंकला आहे. मात्र इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत तो दोन वेळा उपविजेता ठरला. तो संघात असताना बंगळूरला २०१७-१८ मोसमाततर एफसी गोवास २०१८-१९ मोसमात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. चर्चिल ब्रदर्स संघातून खेळताना तो २००८-०९ व २०१२-१३ असे दोन वेळा आय-लीगतर एकवेळ (२००९) ड्युरँड कप विजेता ठरला. चर्चिल ब्रदर्स (२०१३-१४)मोहन बागान (२०१५-१६) व बंगळूर एफसीकडून (२०१६-१७) खेळताना तो तीन वेळा फेडरेशन कप विजेता आहे. भारतीय संघातून तो २०१२ ते २०१५ या कालावधीत आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलात्या दरम्यान भारताने २०१२ मध्ये नेहरू करंडकतर २०१३ मध्ये सॅफ करंडक पटकाविला. लेनी सदस्य असताना त्याच्या संघाने मिळविलेले यश पाहतारवी पुस्कुर यांनी म्हटल्याप्रमाणे लेनी हा विजयी मानसिकता असलेला खेळाडू आहे हे पटते.

 आयएसएल स्पर्धेत लेनी...

- पुणे सिटी एफसी (२०१४२०१५२०१६) : २९ सामने१ गोल

- बंगळूर एफसी (२०१७-१८) : १७ सामने१ गोल१ असिस्ट

- एफसी गोवा (२०१८-१९२०१९-२०) : ४१ सामने२ गोल१ असिस्ट

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com