FC Goa : गोलरक्षण मजबुतीसाठी अर्शदीपची निवड

एफसी गोवाचा नवा खेळाडू; गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी
Arshdeep Singh | FC Goa
Arshdeep Singh | FC GoaDainik Gomantak

पणजी : गतमोसमातील आयएसएल फुटबॉल स्पर्धेत गोलरक्षणात उल्लेखनीय ठरलेल्या अर्शदीप सिंग याला एफसी गोवा संघाने दोन वर्षांसाठी गुरुवारी करारबद्ध केले. तो 2024 मधील मोसमाअखेरपर्यंत या संघात असेल.

अर्शदीप गतमोसमात ओडिशा एफसीकडून खेळला होता. 2021-22 मोसमातील आयएसएल स्पर्धेत एफसी गोवास गोलरक्षणातील कमजोर कामगिरी महागात पडली होती. त्यांना नववा क्रमांक मिळाला होता व तब्बल 35 गोल स्वीकारले होते. एफसी गोवाने गतमोसमात तीन गोलरक्षक वापरले होते. अर्शदीपची निवड करून त्यांनी आता गोलरक्षण भक्कम करण्यावर भर दिला आहे.

‘‘माझ्यासाठी ही स्वप्नपूर्ती आहे. एफसी गोवासाठी खेळण्यासाठी नेहमीच इच्छुक होतो. त्यामुळे त्यामुळे त्यांनी संधी दिली, तेव्हा मी वेगळा विचार करू शकलो नाही. त्यांची खेळण्याची शैली मला भावते, बऱ्याच काळापासून मी त्यांचा चाहता आहे. तथापि, यापूर्वी एफसी गोवाच्या शानदार आक्रमक कामगिरीविरुद्ध मी चुकीच्या जागी होतो,’’ असे 24 वर्षीय अर्शदीपने करारपत्रावर सही केल्यानंतर सांगितले.

एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनीही अर्शदीपचे संघात स्वागत केले. ‘‘अर्शदीप लीगमध्ये चांगलाच रुळलेला आहे आणि चेंडू अडविण्याची त्याची क्षमता अफलातून आहे. त्याचे योगदानही उल्लेखनीय आहे. तो आमच्या शैलीशी लवकरच जुळवून घेईल आणि आगामी वर्षांत मुख्य संघाचा अविभाज्य भाग बनेल,’’ असा विश्वास पुस्कुर यांनी व्यक्त केला.

Arshdeep Singh | FC Goa
होली स्पिरिट चर्चमध्ये चोरी; दीड लाखांची रोकड लंपास

देशातील अनुभवी गोलरक्षक

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या एलिट अकादमीतून कारकिर्दीस सुरवात केलेल्या अर्शदीपला 2015-16 मध्ये मिनर्व्हा पंजाब एफसीने करारबद्ध केले. या संघाने 2017-18 मोसमात आय-लीग स्पर्धा जिंकली. त्यात अर्शदीपने महत्त्वाचा वाटा उचलला, तसेच 2019 मध्ये एएफसी कप स्पर्धेतही प्रतिनिधित्व केले. 2019-20 मधील आयएसएल स्पर्धेपूर्वी त्याला ओडिशा एफसीने करारबद्ध केले. एकूण तीन मोसमात तो या संघातर्फे 33 आयएसएल सामने खेळला. गतमोसमात त्याने 16 सामन्यांत 64 फटके अडविले जे मोसमातील सर्वाधिक ठरले. एकंदरीत आयएसएल कारकिर्दीत अर्शदीपने 3.52 च्या सरासरीने 116 फटके अडविले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com