एफसी गोवाच्या रेडीमवर कडक कारवाई; आणखी एका सामन्यासाठी निलंबित

redeem tlang
redeem tlang

पणजी- एफसी गोवाचा मध्यरक्षक रेडीम ट्लांग याच्यावर अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) शिस्तपालन समितीने कडक कारवाई केली आहे. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील आणखी एका सामन्यासाठी तो निलंबित असेल.

मुंबई सिटीविरुद्धच्या लढतीत रेडीमला थेट रेड कार्ड मिळाले होते, त्यामुळे तो  एफसी गोवाच्या 30 नोव्हेंबरला झालेल्या नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्धच्या सामन्यात निलंबित होता. शिस्तपालन समितीच्या निर्णयामुळे शिलाँगमधील हा 25 वर्षीय मध्यरक्षक आता एफसी गोवाच्या 6 डिसेंबर रोजी होणाऱ्या केरळा ब्लास्टर्सविरुद्धच्या सामन्यातही खेळू शकणार नाही. त्याचे एकूण निलंबन आता दोन सामन्यांचे झाले आहे.

रेडीमचे कृत्य हे गंभीर गैरवर्तन असल्याचा निष्कर्ष काढत एआयएफएफ शिस्तपालन समितीने एआयएफएफ शिस्तपालन नियमानुसार अतिरिक्त सामन्याच्या निलंबनाची शिक्षा केली. गतआठवड्यात त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. खेळाडूच्या उत्तरानंतर शिस्तपालन समितीने आणखी एका सामन्यासाठी निलंबनाची कारवाई केली.

हेतुपुरस्पर प्रतिस्पर्ध्यास इजा आणि जखमी करण्याचे लक्ष्य बाळगल्याबद्दल एफसी गोवाच्या खेळाडूस दोषी ठरविण्यात आले. शिस्तपालन समितीनुसार, उत्तरात खेळाडूने माफी मागितली, तरी तसा हेतू प्रतिस्पर्धी खेळाडू वेदनेत असताना अजिबात दिसत नव्हता.
गेल्या 25 नोव्हेंबर रोजी फातोर्डा येथे झालेल्या आयएसएल सामन्यात  चेंडूवर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात रेडीम याने मुंबई सिटी एफसीच्या हर्नान सांताना याला लाथ मारली होती. या अपराधाबद्दल रेफरींनी सामन्याच्या 40व्या मिनिटास रेडीमला थेट रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले होते. नंतर हे प्रकरण एआयएफएफ शिस्तपालन समितीकडे वर्ग करण्यात आले होते. संबंधित व्हिडिओ चित्रिकरणाचे विश्लेषण केल्यानंतर, खेळातील हे गंभीर कृत्य असून प्रतिस्पर्ध्यांच्या सुरक्षिततेस धोकादायक असल्याचा निष्कर्ष शिस्तपालन समितीने काढला आणि  रेडीमला नोटीस बजावण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com