एफसी गोवाच्या रेडीमवर कडक कारवाई ; आणखी एका आयएसएल सामन्यासाठी निलंबित

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

एफसी गोवाचा मध्यरक्षक रेडीम ट्लांग याच्यावर अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) शिस्तपालन समितीने कडक कारवाई केली आहे. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील आणखी एका सामन्यासाठी तो निलंबित असेल.

पणजी :  एफसी गोवाचा मध्यरक्षक रेडीम ट्लांग याच्यावर अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) शिस्तपालन समितीने कडक कारवाई केली आहे. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील आणखी एका सामन्यासाठी तो निलंबित असेल.

मुंबई सिटीविरुद्धच्या लढतीत रेडीमला थेट रेड कार्ड मिळाले होते, त्यामुळे तो  एफसी गोवाच्या ३० नोव्हेंबरला झालेल्या नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्धच्या सामन्यात निलंबित होता. शिस्तपालन समितीच्या निर्णयामुळे शिलाँगमधील हा २५ वर्षीय मध्यरक्षक आता एफसी गोवाच्या ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या केरळा ब्लास्टर्सविरुद्धच्या सामन्यातही खेळू शकणार नाही. त्याचे एकूण निलंबन आता दोन सामन्यांचे झाले आहे.

रेडीमचे कृत्य हे गंभीर गैरवर्तन असल्याचा निष्कर्ष काढत एआयएफएफ शिस्तपालन समितीने एआयएफएफ शिस्तपालन नियमानुसार अतिरिक्त सामन्याच्या निलंबनाची शिक्षा केली. गतआठवड्यात त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. खेळाडूच्या उत्तरानंतर शिस्तपालन समितीने आणखी एका सामन्यासाठी निलंबनाची कारवाई केली. हेतुपुरस्पर प्रतिस्पर्ध्यास इजा आणि जखमी करण्याचे लक्ष्य बाळगल्याबद्दल एफसी गोवाच्या खेळाडूस दोषी ठरविण्यात आले. शिस्तपालन समितीनुसार, उत्तरात खेळाडूने माफी मागितली, तरी तसा हेतू प्रतिस्पर्धी खेळाडू वेदनेत असताना अजिबात दिसत नव्हता.

 

अधिक वाचा :

आयएसएलच्या कालच्या सामन्यात दुखापतग्रस्त हैदराबादची जमशेदपूरशी 1-1 बरोबरी

 

 

संबंधित बातम्या