एफसी गोवा युवा संघाची भक्कम तटबंदी

pib
मंगळवार, 7 जुलै 2020

एफसी गोवाने आपल्या डेव्हलपमेंट संघासाठी गतआठवड्यात नेस्टर डायसलेस्ली रिबेलोकपिल होबळे यांचा करार वाढविला होता. आता त्यात हॅन्सेल व विद्येश या गोलरक्षकाची नव्याने भर पडली आहे.

पणजी,

एफसी गोवाने आपल्या डेव्हलपमेंट संघाची भक्कम तटबंदी करताना दोघा युवा गोलरक्षकांना करारबद्ध केले आहे. हॅन्सेल कुएल्हो व विद्येश भोसले यांनी २०२२-२३ पर्यंत संघाच्या करारपत्रावर सही केली आहे.

हॅन्सेल व विद्येश या दोघांनी सेझा फुटबॉल अकादमीचे प्रतिनिधित्व केले आहे. त्या संघातून गोवा प्रो-लीग आणि १८ वर्षांखालील स्पर्धेत खेळताना त्यांनी एफसी गोवा संघ व्यवस्थापनास प्रभावित केले. २०१८-१९ मोसमात विद्येश एफसी गोवा डेव्हलपमेंट संघातून लोनवर खेळला होता. आता त्याला तीन मोसमासाठी कायमस्वरूपी करार मिळाला आहे.

‘‘एफसी गोवा कुटुंबाचा भाग बनताना मला खूप आनंद होतोय,’’ अशी प्रतिक्रिया विद्येश याने दिली. एफसी गोवाच्या करारपत्रावर सही करताना आपण आनंदित आहेअसे हॅन्सेल याने सांगितले. या संघातून सामना खेळण्यासाठी आपण आतूर असल्याचे त्याने नमूद केले.

एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी हॅन्सेल व विद्येश या दोघा गोलरक्षकांचे संघात स्वागत करतानात्यांच्यात भरपूर क्षमता असल्याचे सांगितले. मागील काही वर्षे संघ या दोघाही युवा गोलरक्षकांच्या कामगिरीवर लक्ष ठेवून होतोअशी माहिती त्यांनी दिली.‘‘भविष्यात त्यांच्यात मुख्य संघात येण्याइतपत विकसित होण्याची गुणवत्ता आहे,’’ असा विश्वास रवी यांनी व्यक्त केला.

एफसी गोवाने आपल्या डेव्हलपमेंट संघासाठी गतआठवड्यात नेस्टर डायसलेस्ली रिबेलोकपिल होबळे यांचा करार वाढविला होता. आता त्यात हॅन्सेल व विद्येश या गोलरक्षकाची नव्याने भर पडली आहे.

संबंधित बातम्या