एफसी गोवाचा आगामी मोसमासाठी इंडीन्यूजशी करार

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

एफसी गोवा संघाने २०२०-२१ मोसमासाठी नवा मुख्य पुरस्कर्ता शोधला आहे. इंडीन्यूज यांच्याशी त्यांनी आगामी मोसमासाठी करार केला असून खेळाडूंच्या शर्टवरील ते प्रमुख पुरस्कर्ते असतील.

पणजी : एफसी गोवा संघाने २०२०-२१ मोसमासाठी नवा मुख्य पुरस्कर्ता शोधला आहे. इंडीन्यूज यांच्याशी त्यांनी आगामी मोसमासाठी करार केला असून खेळाडूंच्या शर्टवरील ते प्रमुख पुरस्कर्ते असतील. इंडीन्यूज ऑनलाईन क्रीडा पोर्टल आहे. भारतीय फुटबॉलमध्ये त्यांनी एफसी गोवासोबतच्या करारासह प्रवेश केला आहे.

एफसी गोवाच्या माध्यमातून इंडीन्यूज भारतीय फुटबॉलच्या लोकप्रियतेसाठी प्रयत्नशील राहील. एफसी गोवा आयएसएलमधील दोन वेळचा उपविजेता संघ असून गतमोसमात त्यांनी लीग विनर्स शिल्डचा मान मिळविला होता. इंडीन्यूज.कॉमसोबतची भागीदारी यशस्वी ठरेल असा विश्वास एफसी गोवाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य दत्ता यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या