सात सामन्यांतील अपराजित केरळा ब्लास्टर्सविरुद्ध उद्या लागणार कसोटी

संघटनात्मक बचावावर एफसी गोवाचा भर
ISL football

ISL football

Dainik gomantak

पणजी : केरळा ब्लास्टर्सने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (Football) स्पर्धेच्या आठव्या मोसमात सलग सात सामन्यांत अपराजित राहताना आक्रमक खेळाचे छान प्रदर्शन केले. त्यांना रोखण्यासाठी एफसी गोवाने संघटनात्मक बचावावर भर देण्याचे ठरविले असल्याचे मुख्य प्रशिक्षक डेरिक परेरा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

एफसी गोवा आणि केरळा ब्लास्टर्स यांच्यातील सामना रविवारी (ता. 2) वास्को येथील टिळक मैदानावर खेळला जाईल. केरळा ब्लास्टर्सचे सध्या 13 गुण असून ते पाचव्या स्थानी आहेत. सर्बियन इव्हान व्हुकोमानोविच यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने मागील सात लढतीत तीन विजय व चार बरोबरी या कामगिरीसह गुणतक्त्यातील स्थान सुधारले, ते आता प्ले-ऑफ फेरीसाठी प्रयत्नशील आहेत. अगोदरच्या लढतीत जमशेदपूरविरुद्ध 1-1गोलबरोबरीसह गुण विभागून घेतला होता. एफसी गोवास नमवले, तर केरळा ब्लास्टर्सला 16 गुणांसह अव्वल स्थानी असलेल्या मुंबई (Mumbai) सिटीला गाठणे शक्य होईल.

<div class="paragraphs"><p>ISL football</p></div>
International Century 2022: घरच्याच मैदानावरती डेव्हॉन कॉनवेने घडवला इतिहास

एफसी गोवास चार लढतीत अपराजित राहिल्यानंतर मागील लढतीत एटीके मोहन बागानकडून 2-1फरकाने पराभव स्वीकारावा लागला. त्यांचे सध्या आठ गुण असून ते नवव्या क्रमांकावर आहेत. डेरिक यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवास अजून विजयाची प्रतीक्षा आहे. दोनपैकी प्रत्येकी एका लढतीत बरोबरी आणि पराभव अशी कामगिरी डेरिक यांच्या मार्गदर्शनाखाली आहे.

आक्रमणातही योग्य संयोजन हवे

डेरिक म्हणाले, ``बचावफळीत जबाबदारी घेणे आवश्यक आहे. केरळा ब्लास्टर्स आक्रमक शैलीत खेळतो. सध्या हा संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मागील सामन्यानंतर आम्ही संघटनात्मक बचावाच्या दृष्टीने विश्लेषण केले. त्यावर आमचा भर राहील. आम्ही जास्त संधी निर्माण केल्या हे सुखावणारे आहे, पण आक्रमणात अधिक प्रगती आवश्यक आहे. आघाडीफळीत योग्य संयोजनाची गरज आहे.`` अन्नातून विषबाधा झालेला कर्णधार एदू बेदिया सावरला असून तो केरळा ब्लास्टर्सविरुद्ध खेळेल, असा विश्वास डेरिक यांनी व्यक्त केला, मात्र त्याचा ऐराम काब्रेरा अजून तंदुरुस्त नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

<div class="paragraphs"><p>ISL football</p></div>
पाकिस्तान संघाला नंबर वन बनवण्यासाठी पीसीबी 'पॉवर हिटिंग कोच' च्या शोधात !

अन्वर अलीचे संघात स्वागत

एफसी गोवा (goa) संघातील नवा बचावपटू 21 वर्षीय अन्वर अली याचे डेरिक परेरा यांनी संघात स्वागत केले. त्याच्यामुळे बचावफळीत अधिकप्रमाणात पर्याय उपलब्ध होणार असल्याचे त्यांना वाटते. अन्वर हा मेहनती आहे आणि संघाला त्याच्याकडून काय अपेक्षित आहे याची त्याला जाणीव आहे, त्यादृष्टीने तो उत्सुक असल्याचे मत डेरिक यांनी व्यक्त केले.

``प्रत्येक लढत आमच्यासाठी अंतिम सामना आहे. केरळा ब्लास्टर्स हा कठीण संघ असल्याचे सिद्ध करताना, क्लबच्या भविष्यासाठी मजबूत संघ बांधणी करायची आहे. विजेतेपदासाठी आम्ही इच्छुक असल्याचे जाहीर करण्याचा आम्हाला अधिकार नाही. गतमोसमात आम्ही तळातून दुसऱ्या स्थानी होतो. आता आम्ही चांगली कामगिरी करतोय, तरीही आम्हाला नम्र, गप्प राहत परिश्रम घेत राहावे लागेल. आमच्यासाठी अनुकूल स्थिती असेल, तर मोसमाचा अंतिम टप्पा आल्यानंतर पाहू. अस मत प्रशिक्षक केरळा (Kerala) ब्लास्टर्स इव्हान व्हुकोमानोविच यांनी मांडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com