एफसी गोवाची महिला फुटबाॅलपटू स्टेसी कार्दोझच्या कारकिर्दीस नवी दिशी

दैनिक गोमंतक
बुधवार, 19 मे 2021

स्टेसी ही गोव्यातील अनुभवी महिला फुटबॉलपटू आहे. दशकभरापूर्वी तिच्या कारकिर्दीस सुरवात झाली.

पणजी : महिला फुटबॉलपटू स्टेसी कार्दोझ (Stacy Cardozo) हिच्या कारकिर्दीस यंदा नवी दिशा गवसली. गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (Goa Football Association) महिला लीग फुटबॉल स्पर्धेत तिने एफसी गोवाचे (FC Goa) प्रतिनिधित्व करताना सर्वाधिक 12 गोल नोंदवून गोल्डन बूट किताबही पटकाविला. सुमारे दशकभराच्या फुटबॉल कारकिर्दीत स्टेसी बहुतांश बचावफळीतच खेळली, पण यंदा एफसी गोवाने करारबद्ध केल्यानंतर या 27 वर्षीय अनुभवी फुटबॉलपटूने नवी जबाबदारी चोख पेलली. स्टेसीने फुटसाल खेळताना आक्रमकाची भूमिकाही बजावत गोल नोंदविले आहे. तिचे हे वैशिष्ट्य एफसी गोवा महिला संघाचे प्रशिक्षक सुगितेश मांद्रेकर यांनी हेरले व तिला महिला लीग फुटबॉल स्पर्धेत संघाचे आक्रमण धारदार करण्याची संधी दिली. मेहनती स्टेसीने प्रशिक्षकांना निराश केले नाही.(FC Goa women footballer stacy's career takes a new direction)

ISL Football League: गोव्याचा ग्लॅन मार्टिन्स प्रथमच राष्ट्रीय संभाव्य संघात

स्टेसी ही गोव्यातील अनुभवी महिला फुटबॉलपटू आहे. दशकभरापूर्वी तिच्या कारकिर्दीस सुरवात झाली. राष्ट्रीय पातळीवर तिने फुटबॉल आणि फुटसालमध्ये गोव्याचे कितीतरी वेळा प्रतिनिधित्व केले आहे. शानदार कामगिरीच्या बळावर तिची भारताच्या राष्ट्रीय महिला फुटबॉल संघ शिबिरासाठीही निवड झाली. 2020-21 मधील महिला लीग स्पर्धेत या अष्टपैलू खेळाडूने अफलातून गोल नोंदवत वाहव्वा मिळविली. कारकिर्दीच्या सुरवातीस ती आघाडीफळीत खेळत असे, नंतर बचावफळीत स्थिरावली.

``तिच्या क्षमतेची मला माहिती आहे. संघात तिच्यामुळे भरपूर अनुभव येतो. आमच्यासाठी ती मैदानावर सच्ची नेता ठरली. आमचा संघ तिच्यावर खूप अवलंबून राहिला. दर्जेदार खेळाबरोबर तिने नवोदितांचेही चांगल्या प्रकारे नेतृत्व केले,`` असे स्टेसीबद्दल एफसी गोवाचे प्रशिक्षक सुगितेश यांनी सांगितले.

ENG vs NZ: कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा; IPL खेळलेल्यांना विश्रांती

महिला फुटबॉल लीग स्पर्धेत नोंदविलेल्या गोलबद्दल स्टेसीने आनंद व्यक्त केला, त्याचवेळी एफसी गोवातर्फे खेळताना मोसमात खूप नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या, विशेषतः व्यावसायिकता महत्त्वपूर्ण ठरली, असे स्टेसीने नमूद केले. ``वैयक्तिकदृष्ट्या माझ्यासाठी हे वर्षे खूप महत्त्वाचे ठरले. गतमोसमात मी एफसी गोवातर्फे खेळण्यास प्रयत्नशील होते, पण शक्य झाले नाही. यंदा संधी गमावली नाही,`` असे स्टेसी एफसी गोवातर्फे खेळण्याविषयी म्हणाली.

``मला गोल नोंदविण्यास मिळाले. प्रत्येकास हेच आवडते. आणखी सुधारणा साधत गोल करण्याची अपेक्षा बाळगून आहे.``

- स्टेसी कार्दोझ

एफसी गोवाची महिला फुटबॉलपटू 

संबंधित बातम्या