FC Goaने जिंकला ड्युरँड कप

कर्णधार बेदियाचा जादा वेळेतील गोल निर्णायक; मोहम्मेडन स्पोर्टिंगवर मात
FC Goaने जिंकला ड्युरँड कप
FC Goa won Durand CupDainik Gomantak

पणजी: कर्णधार एदू बेदियायाने जादा वेळेतील खेळात थेट फ्रीकिकवर नोंदविलेल्या गोलच्या बळावर एफसी गोवा (FC Goa) संघाने ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धेत (Durand Cup Football Tournament) बाजी मारली. कोलकात्यातील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर रविवारी झालेल्या अंतिम लढतीत गोव्याच्या संघाने स्थानिक मोहम्मेडन स्पोर्टिंगला 1-0 फरकाने पराभूत केले.

निर्धारित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. सामन्याच्या 105व्या मिनिटास एफसी गोवातर्फे पाचवा मोसम खेळणाऱ्या स्पॅनिश बेदियाने गुणवत्तेची झलक प्रदर्शित केली. गोलक्षेत्राच्या समोरून त्याने मारलेला फ्रीकिक फटका मोहम्मेडन स्पोर्टिंगच्या गोलरक्षकाला अडविता आला नाही. गोलरक्षक टी. माविया चेंडू अडविण्यासाठी योग्य दिशेने झेपावला, पण उशीर झाला.

FC Goa won Durand Cup
IPL 2021: PBKS ला नमवत RCB ची प्लेऑफमध्ये धडाकेबाज एन्ट्री

स्पॅनिश प्रशिक्षक हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शाखाली एफसी गोवा संघाने जिंकलेला हा पहिलाच करंडक ठरला. यापूर्वी सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवाने सुपर कप (2019) व आयएसएल लीग विनर्स शिल्डचा (2019-20) मान मिळविला होता. सहाव्यांदा ड्युरँड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणाऱ्या मोहम्मेडन स्पोर्टिंगला चौथ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यापूर्वी त्यांनी दोन वेळा स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.

Related Stories

No stories found.