‘ड्युरँड कप’च्या प्रतीक्षेत एफसी गोवा
फुटबॉलचा सर्व करताना FC गोवा संघ Dainik Gomantak

‘ड्युरँड कप’च्या प्रतीक्षेत एफसी गोवा

ड्युरँड कप’च्या (Durand Cup) प्रतीक्षेत FC गोवा. विजेतेपदासाठी आज कोलकात्यात मोहम्मेडन स्पोर्टिंगचे कडवे आव्हान

पणजी: भारतीय फुटबॉलमधील (Football)आठवा मोसम खेळणाऱ्या FC गोवा संघाने यापूर्वी सुपर कप आणि ISL शिल्डचा मान मिळविला, आता त्यांना देशातील सर्वांत जुन्या करंडकाची प्रतीक्षा आहे. 130 वी ड्युरँड कप स्पर्धा जिंकण्यासाठी कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला दोन वेळच्या माजी विजेत्या मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबचे तगडे आव्हान मागे सारावे लागेल.

मोहम्मेडन स्पोर्टिंग स्थानिक संघ आहे आणि अंतिम लढतीसाठी फुटबॉलप्रेमींना स्टेडियमवर (stadium)प्रवेश मिळणार असल्याने या संघाचे चाहते आंद्रे चेर्नीशोव यांच्या मार्गदर्शनाखालील संघासाठी ‘बारावा खेळाडू’ ठरू शकतात. मोहम्मेडन स्पोर्टिंगने ड्युरँड कप दोन वेळा जिंकला(Win) असून तीन वेळा ते उपविजेते ठरले. शेवटच्या वेळेस 2013 साली त्यांनी नवी दिल्लीत ही प्रतिष्ठित स्पर्धा जिंकली होती. आता सहाव्यांदा अंतिम लढत खेळताना आय-लीगमधील (I-League)संघ यशस्वी होण्यास प्रयत्नशील असेल. उपांत्य लढतीत अतिरिक्त वेळेस कोलकात्याच्या संघाने बंगळूर (Bangalore)युनायटेडला हरविले होते.

फुटबॉलचा सर्व करताना FC गोवा संघ
महिला फुटबॉल संघात मिशेल एकमेव गोमंतकीय

FC गोवा संघ स्पर्धेत अपराजित आहे, पण भारतीय संघात निवड झालेल्या ब्रँडन फर्नांडिस, ग्‍लॅन मार्टिन्स, सेरिटॉन फर्नांडिस, धीरज सिंग यांच्या सेवेस त्यांना रविवारी मुकावे लागेल. उपांत्य लढतीत बंगळूर एफसीने 2-2 गोलबरोबरीत रोखल्यानंतर एफसी गोवाने पेनल्टी शूटआऊटवर बाजी मारली होती. एकंदरीत मोहम्मेडनच्या आक्रमणासमोर एफसी गोवाच्या बचावाची कसोटी लागेल.

तिसरा गोमंतकीय संघ ठरणार?

गोव्यातील चर्चिल ब्रदर्स (Churchill Brothers)व साळगावकर FC या संघांनी ड्युरँड कप (Durand Cup) प्रत्येकी तीन वेळा जिंकला आहे. रविवारी बाजी मारल्यास हा करंडक जिंकणारा एफसी गोवा तिसरा गोमंतकीय फुटबॉल संघ ठरेल.

दृष्टिक्षेप:

  • FC गोवाचे स्पर्धेत 16 गोल, 4 गोल स्वीकारले

  • मोहम्मेडन स्पोर्टिंगने 14 गोल नोंदविताना 6 गोल स्वीकारले

  • FC गोवाचा देवेंद्र मुरगावकर व मोहम्मेडन स्पोर्टिंगचा मार्कुस जोसेफ यांचे प्रत्येकी 5 गोल

  • एफसी गोवाच्या मुहम्मद नेमिल याचे 4 गोल

  • अंतिम लढतीसाठी आम्ही प्रेरित आहोत. हा मोसमपूर्व कालखंड असल्याचे आम्हाला माहीत आहे, मात्र तुम्ही अंतिम लढत खेळता आणि करंडक जिंकण्याची संधी असते, तेव्हा तुम्ही जिंकण्याचाच विचार करता. आत्ताच्या स्थितीत आम्हाला करंडक हवाय.

  • एदू बेदिया, एफसी गोवाचा कर्णधार

Related Stories

No stories found.