एफसी गोवाची मनोरंजक शैली कायम असेल : फेरॅन्डो

एफसी गोवाची मनोरंजक शैली कायम असेल : फेरॅन्डो
Coach Ferrando

पणजी

एफसी गोवाने इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) मागील सहा मोसमात मनोरंजक शैलीने खेळत चाहत्यांची वाहव्वा मिळविली आहे. आता संघाचे नवे प्रशिक्षक ३९ वर्षीय स्पॅनिश ह्वआन फेरॅन्डो यांनीही हीच शैली कायम राखण्याची ग्वाही देतानाआगामी एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचे उद्दिष्टही बाळगले आहे.

एफसी गोवा संघाने २०२०-२१ मोसमासाठी बार्सिलोना येथील फेरॅन्डो यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. ते स्पॅनिश प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांची जागा घेतील. गोव्यातील संघाशी करार करण्यापूर्वी फेरॅन्डो ग्रीसमधील व्होलोस एफसी संघाचे प्रशिक्षक होते. स्पेनमधून संवाद साधताना त्यांनी आगामी मोसम आणि नियोजनाबाबत मनोगत व्यक्त केले.

 खेळाचा आनंद लुटणे महत्त्वाचे

एफसी गोवाच्या शैलीविषयी फेरॅन्डो यांनी सांगितलेकी ‘‘शैली बदलणे आवश्यक आहे असं मला वाटत नाही. खेळाडूंनी त्यांच्या खेळाचा आनंद लुटणे आणि पाठिराख्यांनी खेळाचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टिकोनातून आमच्या शैलीनुसार संघबांधणी करणे हे खूपच गरजेचे आहे. आम्ही ज्याप्रकारे फुटबॉल खेळतोतसेच आमची कार्यपद्धती आणि तत्वज्ञान जाणणारे योग्य खेळाडू हवे आहेत.’’

एफसी गोवाचा प्रशिक्षक या नात्याने अनुभव पूर्णतः नवा असेलअसे स्पष्ट करून फेरॅन्डो यांनी आपली कार्यपद्धती केवळ स्पेन किंवा युरोपपुरती मर्यातील नसल्याचेही नमूद केले. कोविड-१९ महामारीमुळे रिकाम्या स्टेडियममध्ये खेळावे लागत असलेतरी सध्याच्या परिस्थितीबाबत आम्ही काहीच करू शकत नाहीपण खूप वाईट वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

वयाच्या १८व्या वर्षी फेरॅन्डो यांनी प्रशिक्षक या नात्याने कारकिर्दीस सुरवात केली. दुखापतीमुळे आपण खेळणे कायम राखू शकलो नाहीमी फुटबॉलवर प्रेम करत होतोत्यामुळेच प्रशिक्षणाकडे वळलोअसे त्यांनी सांगितले.

 प्रगती कायम राखण्यावर भर

‘‘सर्जिओ (लोबेरा) यांनी उत्तम काम केले आहे. संघाने छान खेळ केला आणि आयएसएल लीग शिल्ड जिंकली. संघाची प्रगती कायम राखणेचांगले फुटबॉल खेळणे आणि एएफसी चँपियन्स लीगमध्ये प्रभावी कामगिरी करणे हा पुढील टप्पा आहे,’’ असे फेरॅन्डो यांनी भविष्याबाबत नमूद केले.

चँपियन्स लीग महत्त्वाची

एएफसी चँपियन्स लीग स्पर्धा केवळ एफसी गोवासाठीच नाहीतर भारतीय फुटबॉलसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. त्या सामन्यांसाठी आम्हाला तयार राहणे गरजेचे आहे. त्याबाबत काही मुद्दे आहेतज्यात बदल आवश्यक आहे. ते अतिशय महत्त्वाचे आहेतअसे फेरॅन्डो यांनी नियोजनाबाबत सांगितले. गतमोसमात आयएसएलच्या साखळी फेरीत अव्वल राहत एफसी गोवाने एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेस पात्र ठरण्याचा मान मिळविला आहे.

 ‘‘सध्या कोविडमुळे उद्‍भवलेल्या परिस्थितीवर मी लक्ष केंद्रित करू इच्छित नाही. गोव्यातील माझ्या क्लबसोबतच्या भविष्याबाबत विचार करत आहे. सामान्य कालखंडाप्रमाणे मोसमपूर्व तयारी आणि संघाची बांधणीतसेच वेळापत्रकाचे नियोजन यावर माझा भर आहे.’’

- ह्वआन फेरॅन्डो,

एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com