यावर्षीही 'एफसी गोवा'वर 'एफसी बंगळूर' भारी पडणार..?

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

नवे आव्हान हा मंत्र जपत बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना सामोरे जाण्याचे गोव्यातील संघाचे नियोजन असले, तरी फातोर्डा येथे आज होणाऱ्या लढतीत बंगळूरच्या संघाची नजर पूर्ण तीन गुणांवर असेल.

पणजी  :  इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत माजी विजेत्या बंगळूर एफसी संघाचे एफसी गोवावर वर्चस्व आहे. त्या अनुषंगाने नवा संघ, नवे आव्हान हा मंत्र जपत बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना सामोरे जाण्याचे गोव्यातील संघाचे नियोजन असले, तरी फातोर्डा येथे आज होणाऱ्या लढतीत बंगळूरच्या संघाची नजर पूर्ण तीन गुणांवर असेल.

आतापर्यंतच्या आयएसएल स्पर्धेतील सात लढतीत बंगळूरने एफसी गोवाविरुद्ध पाच विजय नोंदविले आहेत, त्यात २०१८-१९ मधील अंतिम लढतीचाही समावेश आहे. बंगळूरचे प्रशिक्षक कार्ल्स कुआद्रात यांचा जम बसलेला असून माजी आयएसएल विजेतेही आहेत. मुख्य प्रशिक्षक या नात्याने या ५२ वर्षीय स्पॅनिश मार्गदर्शकांचा हा तिसरा आयएसएल मोसम आहे. तुलनेत एफसी गोवाचे ३९ वर्षीय प्रशिक्षक ज्युआन फेरॅन्डो भारतीय फुटबॉलमध्ये नवखे आहेत. आयएसएलमध्ये त्यांचा हा पहिलाच मोसम आहे.

बंगळूर एफसी बलाढ्य प्रतिस्पर्धी आहे, त्यांचे तत्त्वज्ञानही एफसी गोवाप्रमाणे आक्रमक खेळाचे असल्याचे मान्य करून फेरॅन्डो यांनी, नवा संघ, नवे आव्हान स्वीकारत मैदानावर उतरण्यासाठी आपला संघ तयार असल्याचे शनिवारी आभासी पत्रकार परिषदेत सांगितले. गतमोसमातील अनुभवी खेळाडूंनी एफसी गोवास सोडचिठ्ठी देत दुसऱ्या संघांशी करार केलेला आहे. एदू बेदिया याचा अपवाद वगळता लीग शिल्ड विनर्स संघातील यंदाचे बाकी परदेशी फुटबॉलपटू प्रथमच भारतात खेळत आहेत. भारतीय खेळाडूंतही नवोदितांचा भरणा आहे. त्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक या नात्याने आपला दृष्टिकोन सकारात्मक असल्याचे फेरॅन्डो यांनी नमूद केले. खेळाडू सज्ज असून प्रत्येक सामना जिंकण्याचे लक्ष्य त्यांनी बाळगले आहे.

सुनील छेत्रीवर लक्ष केंद्रित
भारताचा ३६ वर्षीय दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्री बंगळूर एफसीचा हुकमी एक्का आहे. रविवारी बंगळूरची आक्रमणातील मदार छेत्रीवर असेल. आयएसएलमध्ये या अनुभवी स्ट्रायकरने ७४ लढतीत ३९ गोल केले असून तो भारतीय फुटबॉलपटूंत सर्वोत्तम आहे. गतमोसमात बंगळूर येथे यजमान संघाने २-१ फरकाने विजय नोंदविला होता, तेव्हा एफसी गोवाविरुद्धचे दोन्ही गोल छेत्रीनेच नोंदविले होते. गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत छेत्रीने नऊ गोल करून भारतीयांत अव्वल कामगिरी केली होती.

आंगुलोवर मोठी जबाबदारी
मागील तीन मोसमात स्पॅनिश स्ट्रायकर फेरान कोरोमिनास याने एफसी गोवातर्फे ४८ गोल डागले, पण तो यंदा संघात नाही. त्याऐवजी प्राधान्य मिळालेल्या इगोर आंगुलो याच्यावर मोठी जबाबदारी असेल. हा ३६ वर्षीय स्पॅनिश स्ट्रायकर पोलंडमधील व्यावसायिक फुटबॉलमध्ये यशस्वी ठरलेला आहे. तोच फॉर्म भारतात अपेक्षित असेल. आंगुलोने पोलंडमधील गॉर्निक झाब्रझे संघाचे चार मोसम प्रतिनिधित्व करताना ६७ गोल केले होते.

भारताचा ३६ वर्षीय दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्री बंगळूर एफसीचा हुकमी एक्का आहे. रविवारी बंगळूरची आक्रमणातील मदार छेत्रीवर असेल. आयएसएलमध्ये या अनुभवी स्ट्रायकरने ७४ लढतीत ३९ गोल केले असून तो भारतीय फुटबॉलपटूंत सर्वोत्तम आहे. गतमोसमात बंगळूर येथे यजमान संघाने २-१ फरकाने विजय नोंदविला होता, तेव्हा एफसी गोवाविरुद्धचे दोन्ही गोल छेत्रीनेच नोंदविले होते. गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत छेत्रीने नऊ गोल करून भारतीयांत अव्वल कामगिरी केली होती.

संबंधित बातम्या