कोरोच्या होकाराची एफसी गोवास प्रतीक्षा

Dainik Gomantak
गुरुवार, 25 जून 2020

करार ३१ मे रोजी संपलातीन मोसमात स्पॅनिश खेळाडू प्रमुख आघाडीपटू

पणजी

सलग तीन मोसम एफसी गोवाच्या आक्रमणात हुकमी एक्का ठरलेला स्पॅनिश आघाडीपटू फेरान कोरोमिनास (कोरो) याचा करार ३१ मे रोजी संपलेला आहे. ३७ वर्षीय स्ट्रायकर पुन्हा या संघाच्या जर्सीत खेळणार का या प्रश्नास खेळाडूच्या होकाराची प्रतीक्षा आहे.

इस्पॅन्यॉलगिरोनामलोर्का या स्पेनमधील प्रमुख संघातून खेळलेल्या कोरो याच्याशी एफसी गोवाने १७ जुलै २०१७ रोजी करार केला. त्यानंतर २४ मे २०१९ रोजी करार वाढविला. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या दोन मोसमात सर्वाधिक गोल नोंदवत या सेंटर-फॉरवर्ड खेळाडूने गोल्डन बूटचा मानही मिळविला. पहिल्या दोन मोसमात त्याने अनुक्रमे १८ व १६ गोल नोंदविलेतर गतमोसमात लीग विनर्स शिल्ड जिंकलेल्या संघासाठी १४ गोल नोंदवून पुन्हा छाप पाडली. याशिवाय एफसी गोवाच्या २०१९ मधील सुपर कप विजेतेपदात मोलाचा वाटा उचलतानाही गोल्डन बूटचा मान मिळविला होता.

एफसी गोवाकडून सलग तीन आयएसएल मोसम खेळताना कोरो याने ४८ गोल नोंदविले आहेततर दोन सुपर कप स्पर्धेत ७ गोल केले आहेत. मेअखेरीस करार संपुष्टात आल्यानंतर सध्या कोरो करारमुक्त खेळाडू आहे. उपलब्ध माहितीनुसारएफसी गोवा संघ व्यवस्थापनाकडून त्याला आणखी एका मोसमासाठीच्या कराराचा प्रस्ताव आहेपण कोरो याने अजून अंतिम निर्णय घेतलेला नाही.

आगामी मोसमात एफसी गोवाने प्रशिक्षकपदी स्पेनच्याच ह्वआन फेरॅन्डो यांची नियुक्ती केली आहे. संघातील काही अनुभवी खेळाडूंनी सोडचिठ्ठी दिल्यामुळे एफसी गोवाची नव्याने संघबांधणी होत आहे.

 आयएसएल स्पर्धेत कोरो

मोसम सामने गोल असिस्ट

२०१७-१८ २० १८ ५

२०१८-१९ २० १६ ७

२०१९-२० १७ १४ ४

एकूण ५७ ४८ १६

संबंधित बातम्या