IND vs AUS: किंग कोहलीला पाहताच अम्पायरने केला असा इशारा, क्रीडा विश्वात उडाली मोठी खळबळ; Video

Ahmedabad Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे.
Virat Kohli
Virat Kohli Dainik Gomantak

IND vs AUS 4th Test, Virat Kohli-Umpire Issue: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर धडाकेबाज फलंदाज विराट कोहली 59 धावा करुन नाबाद परतला. सलामीवीर शुभमन गिलने 128 धावांची शानदार खेळी केली.

दरम्यान, विराट आणि मैदानावरील अम्पायर नितीन मेनन यांच्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

विराट मोठ्या धावसंख्येकडे जात आहे

34 वर्षीय विराट कोहलीने (Virat Kohli) अहमदाबाद कसोटीच्या तिसऱ्या दिवशी अर्धशतक झळकावले. विराट 128 चेंडूत 59 धावा करुन नाबाद परतला. त्याने आतापर्यंत 5 चौकार मारले आहेत.

कसोटीत खराब फॉर्मशी झगडणाऱ्या या फलंदाजाने तब्बल 14 महिन्यांनंतर या फॉरमॅटमध्ये अर्धशतक झळकावले. अम्पायर नितीन मेनन यांच्यामुळे काहीसा वाद झाला.

मैदानावर खूप नाट्य रंगले होते. याच कारणामुळे विराटला 50 धावा पूर्ण केल्यानंतर बॅट उचलण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागली.

Virat Kohli
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाला नडतोय पुजारा! 'हा' विक्रम करत सचिन-द्रविडच्या पंक्तीत मिळवलं स्थान

अम्पायर बनले विराटचे शत्रू!

डावाच्या 93व्या षटकात विराट 48 धावा काढून खेळत होता. त्याने दोन धावा करुन आपले अर्धशतक पूर्ण केले. ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या भारतीय क्रिकेटपटूंनीही विराटसाठी टाळ्या वाजवायला सुरुवात केली.

दरम्यान, अम्पायर नितीन मेनन यांनी विराटने कमी धावा घेतल्याचा संशय व्यक्त केला. यावर थर्ड अम्पायरची मदत घेण्यात आली. नंतर टीव्ही स्क्रीनवर पाहिल्यावर विराटच्या बॅटचा काही भाग रेषेच्या आत आल्याचे दिसून आले.

Virat Kohli
IND vs AUS: कर्णधार रोहित शर्माने रचला इतिहास, विराट-सचिनच्या या मोठ्या विक्रमाशी बरोबरी

चाहते भडकले

अम्पायर नितीन मेनन यांना पाहून विराटच्या चाहत्यांनीही त्यांचा क्लास लावला. काही चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियावर विराटचा शत्रूही म्हटले. एका यूजरने लिहिले की, पंचांनी विराटला आऊट देण्याची योजना आधीच आखली होती. काहींनी पंच नितीन मेनन यांचे समर्थन केले आणि त्यांच्या तत्परतेचे कौतुक केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com