'FIFA' फुटबॉलमधून कशी करते हजारो कोटींची कमाई? वाचा एका क्लिकवर

FIFA Earning: FIFA ची कमाई खूप मोठी आहे, परंतु ही कमाई कशी होते हे प्रत्येकाला जाणून घ्या.
FIFA Earning
FIFA EarningDainik Gomantak

फिफा (FIFA) ही संघटना जी जगभरातील फुटबॉलचे मॅनेजमेंट करते. पण याची कमाई फुटबॉलमधून कशी होते हे जाणून घ्यायचे आहे. तर ही बातमी नक्की वाचा. फिफा दर चार वर्षांनी वर्ल्डकपचे आयोजन करते. या वर्ल्डकपसाठी जगभरातील फुटबॉल (Football) प्रेमी वाट पाहत असतात. याशिवाय, काही कार्यक्रम आहेत जे विशिष्ट वेळी फिफा आयोजित करतात. ज्या देशात टूर्नामेंट आयोजित केली जाते त्या देशाला फिफाकडून पैसे मिळतात.

याशिवाय मोठी बक्षीस रक्कम, संघांना प्रवास आणि निवास व्यवस्था यांची सुविधा उपलब्ध करुन देणे हे फिफाच्या खर्चाचा भाग आहे. दर चार वर्षांनी फिफा आपल्या खात्याची माहिती देते. 2015-18 दरम्यान FIFA ने 6.4 बिलियन कमावले होते.

FIFA Earning
Team India Viral Video: टीम इंडियाचा स्वॅग, न्यूझीलंडच्या बीचवरील खेळाडूंचा व्हिडिओ व्हायरल

फिफा पैसे कसे कमवते?

फिफाने 2015-18 दरम्यान टीव्ही अधिकारांमधून 4.6 बिलियन कमावले होते. कार्यक्रमादरम्यान जाहिरात करण्यासाठी मोठे ब्रँड फिफाला पैसे देतात. 2018 च्या विश्वचषकापूर्वी फिफाने जाहिरातींमधून 1.66 अब्ज कमावले होते. तिकिटांच्या विक्रीतूनही संस्थेला भरपुर कमाई होते. कारण जगभरात फुटबॉल प्रेमी असंख्य असल्याने तिकिटांची विक्री सुध्दा खूप जास्त होते.

फिफा (FIFA) आपल्या प्रोडक्टला लायसन्स देऊन कमाई करते. उदाहरणार्थ, गेम निर्माता EA ने फिफा नाव वापरण्यासाठी त्यांच्याशी भागीदारी केली आणि 20 वर्षांच्या करारावर स्वाक्षरी केली. या भागीदारीत फिफाने खूप कमाई केली आहे. त्याचप्रमाणे, ते उत्पादनाचा परवाना देऊन इतर मार्गांनी कमाई करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com