FIFA U-17 WC: चिलीचा ‘विश्वकरंडका’तील पहिला विजय

17 वर्षांखालील महिला न्यूझीलंडला 3-1 फरकाने नमविले
FIFA U-17 WC:
FIFA U-17 WC:Dainik Gomantak

पणजी: फिफा 17 वर्षांखालील महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या मुख्य फेरीत दुसऱ्यांदाच खेळणाऱ्या चिलीने मंगळवारी पहिल्या विजयाची नोंद केली. ‘ब’ गट सामन्यात त्यांनी न्यूझीलंडला 3-1 फरकाने सहजपणे हरविले. हा सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला गेला.

(FIFA U-17 women's football World Cup Chile team first victory)

FIFA U-17 WC:
Shikhar Dhawan's Bollywood Debut: क्रिकेटपटू शिखर धवन अभिनेत्री हुमा कुरेशीसोबत झाला रोमँटिक

चिलीचा संघ यापूर्वी 2010 या स्पर्धेत खेळला होता, तेव्हा त्यांना तिन्ही लढतीत पराभूत व्हावे लागले होते. यावेळी दक्षिण अमेरिकेतील या संघाने कमाल केली आहे. सातव्यांदा या स्पर्धेत खेळणाऱ्या न्यूझीलंडला त्यांनी संधी दिली नाही. 4-3-3 या पद्धतीने खेळणाऱ्या ॲलेक्स कॅस्ट्रो यांच्या मार्गदर्शनाखालील संघान पूर्वार्धात दोन गोलची आघाडी घेतली होती.

FIFA U-17 WC:
भारतीय चाहत्यांसाठी मोठी बातमी, हा गोलंदाज T20 World Cup साठी ऑस्ट्रेलियाला होणार रवाना

अँबर फिगेरोआ हिने 12 व्या मिनिटास चिलीस आघाडी मिळवून दिली. नंतर 22 व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर टॅली रोव्हनर हिने संघाची आघाडी भक्कम केली. उत्तरार्धातील खेळ सुरू झाल्यानंतर 52 व्या मिनिटास एमिली क्लेग हिने न्यूझीलंडची पिछाडी सेटपिसेसवर कमी केली. 64 व्या मिनिटास ॲनेस सिफुएन्टिस हिच्या गोलमुळे चिलीची आघाडी 3-1 अशी मजबूत झाली.चिलीचा स्पर्धेतील पुढील सामना जर्मनीविरुद्ध शुक्रवारी (ता. 14) होईल. त्याचदिवशी न्यूझीलंड नायजेरियाविरुद्ध खेळेल.

जर्मनी पिछाडीवरून विजयी

फातोर्ड्यात झालेल्या आणखी एका ‘ब’ गट लढतीत जर्मनीने एका गोलच्या पिछाडीवरून विजयाला गवसणी घातली. त्यांनी नायजेरियाला 2-1अशा फरकाने हरविले. सामन्याच्या 30 व्या मिनिटास शानदार फ्रीकिकवर मिरॅकल युसानी हिने नायजेरियास आघाडी मिळवून दिली.

पूर्वार्धातील पिछाडी जर्मनीने उत्तरार्धात भरून काढली. स्विया स्टॉल्ट हिने 49 व्या मिनिटास बरोबरीचा गोल केल्यानंतर मारा अल्बर हिने 61व्या मिनिटास सातव्यांदा स्पर्धेत खेळणाऱ्या युरोपीय विजेत्या संघाला आघाडी मिळवून दिली.

अमेरिकेकडून भारताचा धुव्वा

भुवनेश्वर येथे झालेल्या अ गटातील लढतीत अमेरिकेने यजमान भारताचा 8-0 फरकाने धुव्वा उडविला. मेलिना रेबिम्बास हिने दोन गोल केले. तिने अनुक्रमे 9 व 31 व्या मिनिटास चेंडूला अचूक दिशा दाखविली. चार्लोट कोहलर (15 वे), ओनयेका गॅमेरो (23वे), जिसेल थॉम्प्सन (39वे), एला एम्री (51वे), टेलर सुवारेझ (59 वे)

भारतीय वंशाची बदली खेळाडू मिया भुता (62 वे) यांनी प्रत्येकी एक गोल केला. विश्रांतीला अमेरिकेचा संघ 5-0 असा आघाडीवर होता. अ गटातील आणखी एका सामन्यात मोरोक्कोस 1-0 फरकाने नमविण्यासाठी ब्राझीलला संघर्ष करावा लागला. जॉन्सन हिने पाचव्या मिनिटास केलेला गोल निर्णायक ठरला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com