Mexico Vs Poland Match Draw: मेक्सिको-पोलंड सामनाही अनिर्णित

दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण; ग्रुप सी मध्ये अर्जेंटिनाच्या अडचणींत वाढ
Mexico Vs Poland Match Draw
Mexico Vs Poland Match DrawDainik Gomantak

Mexico Vs Poland Match Draw: फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत मंगळवारी ग्रुप सी मध्ये झालेल्या मेक्सिको विरूद्ध पोलंड सामना अनिर्णित राहिला. निर्धारीत वेळेसह भरपाई वेळेतही दोन्ही संघांना गोल करता आला नाही. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला आहे.

(FIFA World Cup 2022)

Mexico Vs Poland Match Draw
Saudi Arabia Beats Argentina: मेस्सीच्या अर्जेंटिनाला सौदी अरेबियाचा 'धक्का'

स्टेडियम 974 वर झालेल्या या सामन्यात मेक्सिकोने चेंडुवर 61 टक्के नियंत्रण राखले. मेक्सिकोची पासिंगमधील अचूकता देखील 83 टक्के होती. मेक्सिकोच्या दोन तर पोलंडच्या एका खेळाडुला यलो कार्ड दाखविण्यात आले. मेक्सिकोला 6 कॉर्नर मिळाले तर पोलंडला 5 कॉर्नर मिळाले, पण त्याचे रूपांतर गोलमध्ये करण्यात कुठल्याही संघाला यश आले नाही.

Mexico Vs Poland Match Draw
Iran Football Team to be Jailed?: इराणच्या फुटबॉल संघाला होणार तुरूंगवास?

दरम्यान, ग्रुप सी मध्ये आता टॉप 16 मध्ये जाण्यासाठी चुरस असणार आहे. कारण ग्रुपमधील बलाढ्य आणि विजेतेपदाचा दावेदार समजल्या जाणाऱ्या अर्जेंटिना संघाला तुलनेने दुबळ्या सौदी अरेबिया संघाकडून पराभव स्विकारावा लागला आहे. तर मेक्सिको पोलंड सामना अनिर्णित राहिल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला आहे. त्यामुळे या गटाच्या गुणतक्त्यात सध्या अर्जेंटिना सर्वात शेवटी आहे. सामना अनिर्णित राहिल्यास किमान एक गुण तरी मिळतो, पण पराभूत झाल्यास गुण मिळत नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com