France vs Australia: बेंझेमाच्या अनुपस्थितीतही फ्रान्सने ऑस्ट्रेलियाला चारली पराभवाची धूळ

FIFA World Cup मध्ये गतविजेत्या फ्रान्सकडून ऑलिव्हियर गिरौडने दोन गोल नोंदवत विक्रमी कामगिरी केली
Olivier Giroud | FIFA World Cup 2022
Olivier Giroud | FIFA World Cup 2022Dainik Gomantak

France vs Australia: फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेच्या चौथ्या दिवशी फ्रान्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात अल जानौब स्टेडियम, कतार येथे सामना पार पडला. या सामन्यात गतविजेत्या फ्रान्सने 4-1 अशा गोलफरकाने आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. यासह त्यांनी 3 गुणही मिळवले.

दरम्यान, पहिल्या हाफच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाकडून क्रेग गुडविनने सामन्याच्या 9 व्या मिनिटालाच गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली होती. मात्र ही आघाडी ऑस्ट्रेलियाला पुढे टिकवून ठेवता आली नाही आणि नंतर त्यांना फ्रान्सचा (France) बचावही भेदून पुन्हा गोल करता आला नाही. संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांची पासेसची अचूकता जवळपास सारखी राहिली असली तरी फ्रान्सचा 63 टक्के चेंडूवर ताबा राहिला होता.

Olivier Giroud | FIFA World Cup 2022
Mexico Vs Poland Match Draw: मेक्सिको-पोलंड सामनाही अनिर्णित

फ्रान्सला पहिल्या हाफमध्येच ऍड्रिन रॅबिओट इक्विलाईझने 27 व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली, तर त्यानंतर 4 मिनिटातच म्हणजे 32 व्या मिनिटाला ऑलिव्हियर गिरौडने फ्रान्सला आघाडी मिळवून दिली. ऑस्ट्रेलियाने (Australia) तगडी लढत देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र फ्रान्सच्या कायलियन एमबाप्पे, एँटोनी ग्रिझमन, डेंबेले, गिरौड यांसारख्या स्टार खेळाडूंच्या समोर त्यांना विशेष कामगिरी करणे कठीण गेले.

सेकंड हाफमध्येही फ्रान्सच्या खेळाडूंनी आपला खेळ सुरू ठेवला. फ्रान्सकडून 68 व्या मिनिटाला एमबाप्पेने गोल करत 3-1 अशी आघाडी संघाला मिळवून दिली. त्यानंतर फ्रान्सचा अनुभवी गिरौडने 71 व्या मिनिटाला त्याचा सामन्यातील वैयक्तिक दुसरा, तर संघासाठी चौथा गोल नोंदवला.

Olivier Giroud | FIFA World Cup 2022
Saudi Arabia Beats Argentina: मेस्सीच्या अर्जेंटिनाला सौदी अरेबियाचा 'धक्का'

गिरौडचे विक्रम

फ्रान्सला वर्ल्डकपच्या आधी करिम बेंझेमा दुखापतग्रस्त झाल्याने मोठा धक्का बसला होता. पण पहिल्या सामन्यात तरी त्याची अनुपस्थिती गिरौडने अधिक जाणवू दिली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात दोन गोल करत त्याने फ्रान्सकडून सर्वाधिक गोल नोंदवण्याच्या थेरी हेन्रीची बरोबरी केली.

गिरौडने आत्तापर्यंत फ्रान्सकडून 115 सामन्यांमध्ये 51 गोल नोंदवले आहेत. हेन्रीच्या नावावरही 51 गोलची नोंद आहे. याशिवाय गिरौड हा फिफा वर्ल्डकपमध्ये गोलं करणारा सर्वात वयस्कर युरोपियन खेळाडू ठरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यावेळी त्याने वय 36 वर्षे 53 दिवस इतके होते.

या वर्ल्डकपमध्ये फ्रान्सला दुसरा सामना डेन्मार्कविरुद्ध 26 नोव्हेंबर रोजी खेळायचा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com