फिफाचा वार्षिक पुरस्कार सोहळा होणार ऑनलाईन

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

फिफाचा वार्षिक पुरस्कार सोहळा आभासी (ऑनलाईन) पद्धतीने १७ डिसेंबर रोजी होणार आहे. नियोजित कार्यक्रमानुकार हा सोहळा सप्टेंबरमध्ये मिलानमध्ये होणार होता; परंतु कोरोना विषाणूच्या संकटामुळे तो रद्द करावा लागला.

नवी दिल्ली  :  फिफाचा वार्षिक पुरस्कार सोहळा आभासी (ऑनलाईन) पद्धतीने १७ डिसेंबर रोजी होणार आहे. नियोजित कार्यक्रमानुकार हा सोहळा सप्टेंबरमध्ये मिलानमध्ये होणार होता; परंतु कोरोना विषाणूच्या संकटामुळे तो रद्द करावा लागला; तसेच फ्रान्स फुटबॉल मॅगझिनने बॅलन डी ऑर हा पुरस्कार रद्द केला आहे. 

त्यामुळे या कार्यक्रमात वैयक्तिक सन्मान जाहीर केला जाईल, असे फुटबॉलच्या नियामक मंडळाने शुक्रवारी सांगितले. दरम्यान मागील वर्षी लिओनेल मेस्सी हा सहाव्या वेळी फिफाचा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू पुरस्काराचा मानकरी ठरला, तर महिला गटात मेगन रेपिनो हिने सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून पुरस्कार स्वीकारला. 

याआधी पुरस्काराच्या नामांकनासाठी नावे मतदान पद्धतीने मागविण्यात येतील, यामध्ये राष्ट्रीय संघाचे कर्णधार आणि प्रशिक्षक तसेच मीडिया आणि चाहत्यांकडून बुधवारी सहभागी होतील, असे फिफाने सांगितले. यामध्ये पुरुष आणि महिला गटातून सर्वोत्कृष्ट खेळाडू, गोलरक्षक, सर्वोत्तम प्रशिक्षक आणि सर्वोत्कृष्ट गोल केलेले यांना पुरस्कार दिला जाणार आहे.

अधिक वाचा :

मुंबई सिटीच्या अनुभवी खेळाडूंना नॉर्थईस्टचा ‘दे धक्का’

यावर्षीही एफसी गोवावर एफसी बंगळूर भारी पडणार..? 

संबंधित बातम्या