फिफाचा पाकिस्तानला झटका

 Football Federations blow to Pakistan
Football Federations blow to Pakistan

जागतिक फुटबॉल फेडरेशनने एक मोठा निर्णय घेतला आहे. फिफाकडून पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनवर कारवाई करण्यात आली आहे. निवडून दिलेल्या समितीमध्ये हस्तक्षेप केल्याप्रकरणी फिफाने पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनला आपल्या यादीतून काढून टाकलं आहे. फिफाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. तर दुसरीकडे फिफाच्या या कारवाईमुळे पाकिस्तानच्या फुटबॉलचे धाबे दणाणले आहे.

फिफा आणि नियामक मंडळामध्ये तिसऱ्या पक्षानं हस्तक्षेप केल्यास त्यांच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनच्या मुख्यलयाचा ताबा घेऊन बेकायदेशीर निवडणुका घेत समिती स्थापीत केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.  या आगोदर फिफाने समिती स्थापन केली होती. मात्र ती समिती बरखास्त केल्यामुळे फिफाने आपला रोष व्यक्त केला होता. समितीचे अध्यक्ष हारून मलिक होते. त्य़ांना पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनने हटवल्यामुळे फिफाने दणका दिला आहे. या निर्णयामुळे आता फिफाकडून पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळणार नाही. त्यामुळे आधिच अडचणीमध्ये असलेल्या पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनचा पाय आणखी खोलामध्ये जाणार आहे. ( FIFAs blow to Pakistan)

पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनने बरखास्त केलेली समिती पुन्हा स्थापन केल्यानंतरच ही कारवाई मागे घेण्यात येईल. त्याचबरोबर सर्व आर्थिक व्यवहार आणि व्यवस्थापन या समितीच्या हाती दिल्याची हमी द्यावी लागणार आहे. तसेच भविष्यामध्ये फिफाने स्थापित केलेल्या समितीमध्ये कोणताही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा फिफाने पाकिस्तानच्या फुटबॉल फेडरेशनला दिला आहे.

पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनसोबत चॅडियन फुटबॉल असोसिएशनवर देखील कारवाई करण्यात आली आहे. सरकारने चॅडियन फुटबॉल असोसिएशनमध्ये हस्तक्षेप केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. सरकारने सर्व व्यवहार आपल्या हातामध्ये घेतल्यामुळे फिफाने आपली नाराजी व्यक्त केली आहे. सरकार जोपर्यंत हस्तक्षेप करणं सोडत नाही तोपर्यंत चॅडियन फुटबॉल असोसिएशन यादीतून बाहेर असेल असं फिफाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com