एएफसी चँपियन्स लीगमधील ऐतिहासिक गुणानंतर अल वाहदाविरुद्ध लढत

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत मागील लढतीत पदार्पणात ऐतिहासिक गुणाची कमाई केल्यानंतर, एफसी गोवाचे आता संयुक्त अरब अमिरातीच्या अल वाहदा क्लबला जोरदार टक्कर देण्याचे ध्येय असून आक्रमणात आणखी प्रगती साधण्याचे लक्ष्य बाळगले आहे.

पणजी : आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत मागील लढतीत पदार्पणात ऐतिहासिक गुणाची कमाई केल्यानंतर, एफसी गोवाचे आता संयुक्त अरब अमिरातीच्या अल वाहदा क्लबला जोरदार टक्कर देण्याचे ध्येय असून आक्रमणात आणखी प्रगती साधण्याचे लक्ष्य बाळगले आहे. (Fighting against Al Wahda after a historic point in the AFC Champions League) 

पाकिस्तानच्या संपूर्ण संघावर एकटा विराटच पडतोय भारी

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शनिवारी (ता. 17) एफसी गोवा आणि अल वाहदा यांच्यातील ई गट सामना होईल. त्यानंतर इराणचा पर्सेपोसिल एफसी आणि कतारचा अल रय्यान क्लब यांच्यात लढत होईल. सध्या ई गटात गतवेळच्या उपविजेत्या पर्सेपोलिस एफसीचे तीन, एफसी गोवा आणि अल रय्यान क्लबचे प्रत्येकी एक गुण, तर अल वाहदा क्लबने अजून गुणतक्त्यातील खाते उघडलेले नाही.

एफसी गोवाने स्पर्धेतील पहिल्या लढतीत भक्कम बचावाचे प्रदर्शन करताना अल रय्यान क्लबला गोलशून्य बरोबरी रोखले होते, तर अल वाहदा क्लबला पर्सेपोलिस संघाकडून एका गोलने हार पत्करावी लागली होती.

IPL 2021 PBKS vs CSK: आज चेन्नई विरुद्ध पंजाब सामना; काय असेल प्लेयिंग-11

 
प्रगतीचे उद्दिष्ट : फेरांडो
''मागील लढतीत आम्ही गुणाची कमाई केली आणि अर्थातच प्रगती साधत पुढील लढतीकडे पाहत आहोत. आम्ही जेव्हा आक्रमण करतो तेव्हा नियंत्रण राखणे आवश्यक आहे,`` असे एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ''याठिकाणी एक संघ या नात्याने कार्यरत राहणे आणि केवळ चँपियन्स लीगवर लक्ष केंद्रीत करणे महत्त्वाचे आहे. क्लब या नात्याने आमच्यासाठी हा प्रवास खूपच महत्त्वाचा असला, तरी सामन्यात आम्हाला ताठ मानेने खेळायचे आहे,'' असेही या 40 वर्षीय स्पॅनिश प्रशिक्षकाने सांगितले. पहिल्या सामन्यातील बचावफळीतील कामगिरीवर फेरांडो यांनी समाधान व्यक्त केले, त्याचवेळी आक्रमकणात सुधारणेचे गरज त्यांनी प्रतिपादली.

कामगिरीवर समाधानी : टेन कॅटे
''आपला संघ जरी पहिल्या सामन्यात पराभूत झाला, तरी संघाच्या कामगिरीवर नाखूष नाही. आम्ही आशियातील एका सर्वोत्तम संघाविरुद्ध खेळलो, तरीही मागील लढतीत किमान एका गुणाची अपेक्षा होती,''  असे अल वाहदा क्लबचे डच प्रशिक्षक हेन्क टेन कॅटे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. एफसी गोवाविरुद्धच्या सामन्यात तंदुरुस्त कर्णधार ईस्माईल मातार याची उपस्थिती अल वाहदा क्लबसाठी दिलासा देणारी असेल. ''स्टेडियमवर प्रेक्षक नाहीत, त्यामुळे एफसी गोवास घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ मिळणार नाही,''  असेही त्यांनी नमूद केले. टेन कॅटे यांनी एफसी गोवाच्या मागील लढतीत केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. ''एफसी गोवाचा अल रय्यानविरुद्धचा सामना पाहिला, हा खूप चांगला संघटित संघ आहे. बचावफळीत खूप चांगली आहे आणि त्यांचा गोलरक्षक संघातील मजबूत भाग आहे,'' असे टेन कॅटे म्हणाले.

 शनिवारचे सामने (ई गट)
- अल वाहदा (संयुक्त अरब अमिराती) वि. एफसी गोवा (भारत), रात्री 8 वाजता
- अल रय्यान (कतार) विरुद्ध पर्सेपोलिस (इराण), रात्री 10.30 वाजता
- दोन्ही सामने फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर

दृष्टिक्षेपात...
- अल वाहदा क्लब 12व्यांदा एएफसी चँपियन्स लीगसाठी पात्र
- अल वाहदा क्लबचे मागील 5 लढतीत 3 विजय, 2 पराभव
- एएफसी चँपियन्स लीगमध्ये 2007 मध्ये अल वाहदा उपांत्य फेरीत, आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी
- आयएसएल स्पर्धेसह एफसी गोवाचे सलग 16 सामन्यांत 5 विजय, 11 बरोबरी
- एफसी गोवाच्या मागील 4 लढतीत सलग बरोबरी
 

संबंधित बातम्या