FIH Pro-League: भारतीय महिला हॉकी संघाचा अमेरिकेवर 4-0 ने दणदणीत विजय

भारतीय महिला हॉकी संघाने युनायटेड स्टेट्सचा 4-0 असा पराभव करून तिसरे स्थान पटकावले आहे.
IND vs USA, FIH Pro League
IND vs USA, FIH Pro LeagueDainik Gomantak

भारतीय महिला हॉकी संघाने (Indian Women's Hockey Team) त्यांच्या एफआयएच प्रो लीग पदार्पणाच्या मोसमामध्ये बुधवारी दोन लेगच्या सामन्यात युनायटेड स्टेट्सचा 4-0 असा पराभव करून तिसरे स्थान पटकावले आहे. मंगळवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने अमेरिकेचा 4-2 असा पराभव केला होता. (FIH Pro League Indian women hockey team defeats USA 4 and 0)

IND vs USA, FIH Pro League
Video: दोन टप्प्यांवर बटलरचा गगनचुंबी षटकार

भारतातर्फे वंदना कटारिया (39व्या आणि 54व्या मिनिटाला) दोन गोल केले तर सोनिका (54वे) आणि संगीता कुमारी (58वे) यांनी प्रत्येकी एक गोल केला आहे. अर्जेंटिनाच्या संघाने याआधीच विजेतेपद पटकावले आहे, तर नेदरलँड संघाने हॉकीमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे.

अमेरिकेने खेळाच्या दुसऱ्याच मिनिटाला पहिली संधी घेतली पण एलिझाबेथ येगरचा दमदार शॉट भारतीय कर्णधार आणि गोलरक्षक सविताने हाणून पाडला. त्यानंतर शर्मिला देवीने गोल करण्याची सुवर्णसंधी गमावली कारण ती अमेरिकन गोलकीपरच्या जवळ होती.

सलीमा टेटेने उजव्या टोकाकडून गोल साठी अनेक संधी निर्माण केल्या मात्र पहिल्या क्वार्टरमध्ये एकही गोल झाला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये 23व्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण तो देखील वाया गेला. त्यानंतर भारताला आणखी दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण संघाला गोल करता आला नाही, त्यामुळे हाफ टाईम 0-0 असा बरोबरीतच राहिला.

मध्यांतरानंतर नवनीत कौरचा पेनल्टी कॉर्नरवर मारलेला फटका अमेरिकेचा गोलरक्षक केल्सी बिंगने रोखून धरला. पाचव्या पेनल्टी कॉर्नरवर गुरजित कौरचा फ्लिक वंदनाने 39व्या मिनिटाला डावलून भारताने तिथे आघाडी आपल्या हातात घेतली. त्यानंतर नवनीतने सोपी संधी गमावली.

IND vs USA, FIH Pro League
पाकिस्तान क्रिकेट संघ जुलैमध्ये श्रीलंका दौऱ्यावर

भारताने मात्र चार मिनिटांत तीन गोल नोंदवून सामना आपल्या नावावर केला. प्रथम वंदनाने उजव्या टोकाकडून गोल केला आणि त्यानंतर काही सेकंदांनी सोनियाने लगेच गोल केला. तर सविताने 57व्या मिनिटाला मैदानी गोल करून स्कोअर 4-0 असा केला. नेदरलँड्स आणि स्पेन यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ते 17 जुलै दरम्यान होणाऱ्या महिला विश्वचषकापूर्वी या विजयामुळे भारताचा आत्मविश्वास वाढेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com