वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लॉर्ड्सऐवजी साऊथॅम्प्टनवर खेळवला जाणार

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 9 मार्च 2021

आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना हा आधी लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार होता. परंतु, आता त्याचे ठिकाण बदलून तो साऊथॅम्प्टन येथे खेळवला जाणार आहे.

मुंबई : आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना हा आधी लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार होता. परंतु, आता त्याचे ठिकाण बदलून तो साऊथॅम्प्टन येथे खेळवला जाणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींनी सोमवारी ही माहिती दिली. या जागेतील बदलाबाबत अद्याप आयसीसी ने अधिकृत घोषणा केली नसली, करी गांगुली यांनी अंतिम सामना साऊथॅम्प्टन मैदानावरच खेळवला जाणार असल्याचे सांगितले आहे. मी भारत आणि न्यूझीलंडमध्ये साऊथॅम्प्टन येथे खेळवला जाणारा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या साऊथॅम्प्टन येथे होणाऱ्या अंतिम सामन्यास हजेरी लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.  

इंझमामनं ऋषभ पंतचं तोंडभरुन केलं कौतुक

"वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना साऊथॅम्प्टनमध्येच होणार आहे. आहे. बरेच दिवस आधी याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीचा विचार करता साऊथॅम्प्टन हेच या परिस्थितीत सामना खेळवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. साऊथॅम्प्टन क्रिकेट मैदानापासून हॉटेल्स अगदी जवळ आहेत, त्यामुळे आरोग्याच्य दृष्टीने विचार करता अंतिम सामना साऊथॅम्प्टनमध्येच खेळवला जाणे सोयीस्कर आहे. खेळाडूंनी कोरोनाकाळातही मोठी कामगिरी केली आहे. आयपीएलपासून सप्टेंबरमध्ये अगदी मार्चच्या सुरूवातीपासून ते खेळत आहेत, बायो-बबल्समध्ये 6 महिने राहिले असतानाही त्यांनी जे साध्य केले ते आश्चर्यकारक आहे", असे गांगुली म्हणाला.

ISL 2020 -21: नॉर्थईस्टला ऐतिहासिक संधी; एटीके मोहन बागानचे खडतर आव्हान

त्यांच्या तब्येतीबाबत विचारले असता, "मी तंदुरुस्त आहे, अगदी ठीक आहे, मी आता थोडा वेळ काम करायला परत आलो आहे, मी इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या T20 सामन्याला हजेरी लावेन", असे सौरव गांगुली म्हणाले. 
 

संबंधित बातम्या