ABD Retirement: अखेर एबी डिव्हिलिअर्स निवृत्त

दैनिक गोमंतक
मंगळवार, 18 मे 2021

गेल्या महिन्यात आयपीएलमध्ये खेळत असताना एबीने स्फोटक फलंदाजी केली होती.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट (South Africa Cricket Board) संघाचा माजी कर्णधार आणि धुवादार फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा (AB DE Villiers) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्याचा मार्ग बंद झाला आहे.  दक्षिण आफ्रिकन क्रिकेटने मंगळवारी हे स्पष्ट केले की बोर्ड त्याला सेवानिवृत्तीनंतर मैदानात परतण्याची संधी देणार नाही. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) फॉर्मात फलंदाजीनंतर एबीने पुनरागमन करण्याचे संकेत दिले होते पण साऊथ आफ्रिका क्रिकेट बोर्डाने त्याला पूर्ण विराम दिला आहे. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक मिस्टर 360 म्हणून ओळखल्या जाणार्‍या एबी डिव्हिलियर्सला मंगळवारी जोरदार धक्का बसला. डिव्हिलियर्सच्या परतीविषयी चर्चा सुरू होती. परंतू, दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने या प्रकरणातील सर्व अटकळ संपल्याची माहिती आयसीसीने दिली आहे.

बोर्डाने हे स्पष्ट केले आहे की एबी डिव्हिलियर्सशी सेवानिवृत्तीबाबत चर्चा झाली होती, ज्यात तो म्हणाले होते की मी परत येऊ इच्छित नाही. त्याने जाहीर केलेली सेवानिवृत्ती हा त्यांचा अंतिम निर्णय होता आणि तो यावर पुन्हा विचार करण्यार नाही. मागील अनेक महिन्यांपासून त्याच्या सेवानिवृत्ती आणि राष्ट्रीय संघात पुनरागमन याविषयी चर्चा होती. यावर्षी ऑक्टोबरमध्ये होणार्‍या टी -20 विश्वचषकात त्याला भारतात खेळण्याची संधी देण्यात आल्याच्या बातम्या आल्या होत्या. 23 मे 2018 रोजी एबीने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना चकित केले होते. एक वर्षानंतर, 2019 मध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळला जाणार होता आणि प्रत्येकजण त्याच्या निवृत्तीबद्दल बरेच बोलले.

गेल्या महिन्यात आयपीएलमध्ये खेळत असताना एबीने स्फोटक फलंदाजी केली होती. त्याने 7 सामन्यात 51 च्या सरासरीने दोन अर्धशतकांसह 207 धावा केल्या होत्या. एबीने यात 16 चौकार आणि 10 षटकार लगावले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याविषयी आणि टी -20 विश्वचषकात खेळण्याबद्दल बोलले जात होते.

 

 

संबंधित बातम्या