फिनलंडचा फुटबॉलपटू भारतात खेळणार

फिनलंडचा फुटबॉलपटू भारतात खेळणार
jony 1.jpg

पणजी : सध्या सुरू असलेल्या युरो करंडक फुटबॉल (Euro Cup football) स्पर्धेत फिनलंडचे (Finland) साखळी फेरीत प्रतिनिधित्व केलेला जॉनी काऊको आगामी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत कोलकात्याच्या (Kolkata) एटीके मोहन बागानतर्फे (ATK Mohan Bagan) खेळणार आहे.

एटीके मोहन बागानने फिनलंडच्या (Finland) खेळाडूला गुरुवारी करारबद्ध केल्याची माहिती `आयएसएल`तर्फे देण्यात आली. काऊको 2020-21 मोसमात कोलकात्यातील संघाच्या ग्रीन-मरून जर्सीत दिसेल. युरो करंडक स्पर्धेत फिनलंडचे आव्हान साखळी फेरीत संपुष्टात आले. फिनलंडने पहिल्या लढतीत डेन्मार्कला (Denmark) हरविले, पण नंतर त्यांना रशिया (Russia) व बेल्जियमकडून (Belgium) हार पत्करावी लागली. काऊको तिन्ही सामन्यांत खेळला होता. (The Finland footballer will play in India)

मध्यफळीत खेळणारा काऊको 30 वर्षांचा आहे. वयोगट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळल्यानंतर त्याने फिनलंडच्या सीनियर संघात पदार्पण केले. यापूर्वीचे तीन मोसम तो डेन्मार्कमधील एस्बर्ग क्लबतर्फे (Asberg Club) खेळला. एटीके मोहन बागान संघ एएफसी कप स्पर्धेत खेळणार आहे, त्यामुळे काऊको अंतोनियो लोपेझ हबास यांच्या मार्गदर्शनाखालील संघासाठी उपलब्ध असेल. गतमोसमात एटीके मोहन बागान संघ आयएसएल स्पर्धेत उपविजेता ठरला होता.  

एटीके मोहन बागानच्या करारपत्रावर सही केल्यानंतर काऊको याने फिनलंडमधून संघाच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ऐतिहासिक परंपरा असलेल्या संघात रुजू होताना आपण उत्साहित असल्याचे, तसेच आकर्षक भारतीय संस्कृतीबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असल्याचे त्याने नमूद केले आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com