विराट कोहलीची पहिली ऑडी कार मुंबई पोलिस स्टेशनमध्ये धूळखात पडून

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 13 डिसेंबर 2020

विराट कोहली सध्या जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे आणि सध्या सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटपटू आहे. या भारतीय कर्णधारांची प्रचंड लोकप्रियतेने त्याला डझनभर ब्रँड्सचा अ‍ॅम्बेसेडर बनवलंय.

मुंबई :   विराट कोहली सध्या जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे आणि सध्या सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटपटू आहे. या भारतीय कर्णधारांची प्रचंड लोकप्रियतेने त्याला डझनभर ब्रँड्सचा अ‍ॅम्बेसेडर बनवलंय. त्याच्या या अतुलनीय लोकप्रियतेमागचे कारण म्हणजे क्रिकेट मैदानावरील अभूतपूर्व फलंदाजी आणि युवा पिढीला आकर्षित करणारे त्यांचे व्यक्तिमत्व. विराट कोहलीला नवनवीन व अद्ययावत गाड्या खरेदी करण्याचा छंद आहे. त्याचं पार्किंग अनेक पॉश आणि लक्झरी गाड्यांनी भरलेलं आहे. तो बर्‍याच दिवसांपासून ऑडी इंडियाचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडरसुद्धा आहे. पण विराट कोहलीची पहीली ऑडी कार मुंबईतील एका पोलिस ठाण्यात धूळखात पडून आहे.

 

'विराट कोहली हा जणू ऑस्ट्रेलियनच'

 

विराटची गाडी पोलिस स्टेशनवर का?

२०११ मध्ये विराटनी ही ऑडी आर 8 कार एका ब्रोकरमार्फत सागर ठक्कर नावाच्या व्यक्तीला विकली होती. सागर ठक्कर नंतर एका घोटाळ्यामध्ये सामील झाला होता आणि त्यामुळे पोलिसांनी त्यांची गाडी ताब्यात घेतली. विराट कोहलाकडून ही कार त्याने त्याच्या मैत्रिणीला भेट देण्यासाठी खरेदी केली होती. प ण त्याने केलेल्या घोटाळ्यामुळे सागर अडचणीत सापडला आणि त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली. त्याच्या मालमत्तांवर मुंबई पोलिसांनी छापा टाकला आणि ऑडी आर 8 ही गाडीदेखील ताब्यात घेतली. सागरने ही कार सुमारे अडीच कोटी रुपयात खरेदी केली होती आणि दोन महिन्यांतच ती ताब्यात घेण्यात आली. तेव्हापासून ही गाडी मुंबई पोलिसांच्या मैदानात उभे आहे. याआधी विराट कोहलीला बर्‍याच वेळा या ऑडी आर 8 गाडीतून फिरताना बघितले होते.

 

 

संबंधित बातम्या