Ashes 2021: 26 वर्षांनंतर प्रथमच अ‍ॅशेजचा अंतिम सामना गाबा स्टेडियमवर

दैनिक गोमंतक
गुरुवार, 13 मे 2021

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड मालिका ब्रिस्बेनच्या गाबा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू होणार आहे.

इंग्लंड आणि औस्ट्रेलिया (ENG vs AUS)  दरम्यान होणाऱ्या बहुचर्चित अ‍ॅशेज सिरीजची शेवटचा सामना 26 वर्षात पहिल्यांदाच पर्थमध्ये (Parth) होणार आहे. यापूर्वी प्रत्येक वर्षी अंतिम सामना सिडनीमध्ये झालेला आहे. सिरीजची सुरुवात 9 डिसेंबर रोजी ब्रिस्बेनमधून होईल. माध्यमाच्या माहितीनूसार 5 कसोटी सामने असणाऱ्या या सिरीजचा अंतिम सामना 16 जानेवारी रोजी पर्थमध्ये खेळाला जाईल. 1995 नंतर प्रथमच अंतिम सामना सिडनीच्या (Sydney) जागी पर्थमध्ये होणार आहे. बाकी चार सामने ब्रिस्बेन, एडिलेड, मेलबर्न आणि सिडनी या मैदानांवर खेळले जाणार आहेत. (For the first time in 26 years, the Ashes final will be played at Gabba Stadium) 

माजी फुटबॉलपटू मदेरा कोविड योद्ध्यांच्या मदतीस

पहिला सामना गाबा स्टेडियमवर (Gabba Stadium)
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका ब्रिस्बेनच्या गाबा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू होणार आहे. या स्टेडियमवर यावर्षी भारताविरुद्धच्या झालेल्या  मालिकेत ऑस्ट्रेलियाला 32 वर्षांनंतर पराभवाला सामोरे जावे लागले होते. भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून मालिका आपल्या नावावर केली होती. ऑस्ट्रेलियाला या अगोदर 1988 मध्ये वेस्ट इंडिस संघाने त्या मैदानावर हरवले होते. त्याचबरोबर 2003 मध्ये भारताने मालिका बरोबरीत ठेवली होती. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेनमधील गाबा मैदानावर 56 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी 33 सामने जिंकले आहेत. तसेच 13 अनिर्णित राहिले आहेत आणि ते केवळ नऊ सामने गमावले आहेत. त्याच वेळी, एक सामना टाय झाला होते.

अफगाणिस्तान विरुद्ध सराव सामना
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये अफगाणिस्तानशी एक कसोटी सामना खेळेल. अफगाणिस्तानच्या संघाला  कसोटीचा संघाचा दर्जा मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलिया प्रथमच त्यांच्याविरूद्ध खेळणार आहे. अफगाणिस्तानला 2018 मध्ये कसोटी संघाचा दर्जा मिळाला होता. अफगाणिस्तानने आतापर्यंत भारत, आयर्लंड, बांगलादेश, वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वेविरुद्ध फक्त 6 कसोटी सामने खेळले आहेत.

झिम्बाब्वेला पराभूत करत पाकिस्तान संघानं ''या'' कृतीमुळे...

एडिलेडमधील दुसरा सामना डे नाईट
मालिकेचा दुसरा सामना एडिलेडमधील मैदानावर (Adelaide Stadium) डे नाईट खेळवला जाईल. मात्र ऑस्ट्रेलिय क्रिकेटने अद्याप संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलेले नाही. परंतू, एडलेडमधील दुसरा कसोटी सामना 16 नोव्हेंबरपासून होऊ शकेल अशी माहिती ऑस्ट्रेलियातील एका माध्यमाने दिली. ऑस्ट्रेलियाने एडलेडमध्ये आठ डे नाईट सामने खेळले आहेत आणि सर्व सामने जिंकले आहेत.

 

संबंधित बातम्या