IPL 2021: आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच अस काहीतरी घडलं

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

आयपीएलच्या इतिहासामध्ये कधीच काही घडलं नाही अशी घटना घडली आहे.

गुरुवारी आयपीएल 2021 चा सातवा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटलमध्ये मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळला गेला या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, त्यानंतर दिल्ली कॅपिटलचा डाव खूपच खराब सुरू झाला,  दिल्लीने 4 फलंदाज फक्त 37 धावांत गमावले. रिषभ पंतने कर्णधारपदाच्या खेळीत दिल्ली कॅपिटलचा डाव हाताळला आणि 51 धावा केल्या. ज्यामुळे दिल्ली संघाला 147 धावा करता आल्या. त्यास उत्तर देताना राजस्थान रॉयल्सची सुरवात देखील खराब झाली. त्यांनी 42 धावांवरच 5  गडी गमावले होते.पण सामन्याच्या अंतिम षटकात राजस्थान रॉयल्सचा खेळाडू ख्रिस मॉरिसने 36 धावा फटकावून आपल्या संघाचा विजय मिळवून दिला.(For the first time in the history of the IPL, something like this happened)

IPL 2021 DC vs  RR : 16 कोटीच्या खेळाडूने राखली इज्जत 

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच हे घडलं 
आयपीएलच्या इतिहासामध्ये कधीच काही घडलं नाही अशी घटना घडली आहे. काल राजस्थान रॉयल आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात आयपीएलच्या इतिहासात एक लाजिरवाणा विक्रम झाला आहे.  या सामन्यात दिल्ली कॅपिटलच्या डावात एकही षटकार लागला नाही. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच हा रेकॉर्ड दिल्लीच्या टीमने  आपल्या नावावर नोंदविला आहे. आयपीलमध्ये असा एकही सामना झाला नव्हता ज्यात षटकार ठोकला गेला नव्हता.

दोन्ही संघ बरोबरीत 
गुरुवारी खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटलने या मोसमात प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत. त्याशिवाय दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला आहे आणि एक गमावला आहे, त्यानंतर दोन्ही संघ पॉइंट टेबलमध्ये 2-2 गुणांसह बरोबरीत आहेत. दिल्लीचा पुढचा सामना पंजाब किंग्स सोबत आहे तर राजस्थानचा पुढचा सामना चेन्नई सोबत आहे. 

संबंधित बातम्या