वेळसाव क्लबचा पहिला विजय

वेळसाव क्लबचा पहिला विजय
The first victory of Velsav Club

पणजी : सामना संपण्यास तीन मिनिटे बाकी असताना ब्रायन मस्कारेन्हास याने नोंदविलेल्या गोलच्या बळावर वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लबने बुधवारी गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. त्यांनी चुरशीच्या लढतीत पणजी फुटबॉलर्सला 2-1 फरकाने निसटते हरविले.

सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. जेस्लॉय मोनिझ याने वेळसाव क्लबला 39व्या मिनिटास आघाडी मिळवून दिली. त्यामुळे पूर्वार्धाअखेरस दक्षिण गोव्यातील संघ एका गोलने आघाडीवर होता. 79व्या मिनिटास अक्रम यादवाड याने पणजी फुटबॉलर्सला बरोबरी साधून दिल्यानंतर चुरस वाढली. अखेरीस 87व्या मिनिटास ब्रायन मस्कारेन्हासने लक्ष्य साधल्यामुळे वेळसाव क्लबला स्पर्धेत प्रथमच पूर्ण तीन गुणांची कमाई करता आली. वेळसाव क्लबचे या विजयामुळे आता चार गुण झाले आहेत, तर पणजी फुटबॉर्सचे पराभवामुळे सहा गुण कायम राहिले. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com