Pakistan Super League: सट्टेबाजी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश

arrested
arrested

पाकिस्तान सुपर लीगचे(PSL 2021) क्रिकेट सामने सध्या दुबईत खेळले जात आहेत. या क्रिकेट सामन्यांबाबत हैदराबादमध्ये सट्टेबाजी चालू होती. याबाबत माहिती मिळताच सायबराबाद स्पेशल ऑपरेशन्स टीमने निझामपेट येथील घरावर छापा टाकला. या छाप्यादरम्यान 5 सट्टेबाजांना अटक करण्यात आली. आरोपींकडून एक सट्टेबाजी बोर्ड, एक लॅपटॉप, 33 मोबाइल फोन आणि 20.5 लाख रूपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.(Five accused have been arrested for betting on the Pakistan Super League)

आरोपी सोमाना प्रधान, जो आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील रहिवासी आहे, अद्याप फरार आहे. सोमन्ना आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आपल्या 5 साथीदारांसह ऑनलाईन क्रिकेट खेळत होता. पैशाचे सर्व व्यवहारही ऑनलाईन होत होते, अशी माहिती सायबराबादचे पोलिस आयुक्त व्हीसी सज्जनार यांनी दिली.

ऑनलाइन पैशाचा व्यवहार
क्रिकेट सट्टेबाजीचा व्यवसाय लाइव्ह लाईन गुरु, क्रिकेट माजदा, लोटस, बेट -365, बेट फेअर सारख्या अनेक अ‍ॅप्सद्वारे चालविला जात होता. पोलिसांनी सांगितले की आरोपी सगळ्या मर्यादा पार करून हा सट्टा लावत होते. या प्रकरणी सायबरबाद पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. पवन कुमार, सतीश राजू, त्रिनाथ, भास्कर आणि प्रसाद अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व आंध्र प्रदेशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचे रहिवासी आहेत. त्याचवेळी त्याचा आणखी एक साथीदार सोमन्नचा शोध घेण्यात येत आहे.

कोरोनाव्हायरसमुळे(Coronavirus) पुढे ढकलण्यात आलेल्या पाकिस्तान सुपर लीगचे (पीएसएल 2021) उर्वरित सामने 9 जूनपासून सुरू झाले आहेत. यापूर्वी ही टी -20 स्पर्धा 1 जूनपासून सुरू होणार होती, परंतु ती आणखी 9 जूनपर्यंत वाढविण्यात आली. पीएसएल 2021 च्या उर्वरित 20 सामन्यांच्या वेळापत्रकानुसार सर्व 20 सामने 9 जून ते 24 जून या कालावधीत होणार आहेत, अर्थात अंतीम सामना 24 जून रोजी खेळला जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com