संभाव्य भारतीय फुटबॉल संघात गोव्याच्या पाच खेळाडूंचा समावेश

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 3 मार्च 2021

भारताच्या ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय फुटबॉल लढतीसाठी मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी 35 सदस्यीय संभाव्य संघ जाहीर केला असून त्यात पाच गोमंतकीय फुटबॉलपटूंचा समावेश आहे.

पणजी :  भारताच्या ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय फुटबॉल लढतीसाठी मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी 35 सदस्यीय संभाव्य संघ जाहीर केला असून त्यात पाच गोमंतकीय फुटबॉलपटूंचा समावेश आहे. संभाव्य भारतीय फुटबॉल संघात बचावपटू सेरिटन फर्नांडिस, आदिल खान, मंदार राव देसाई, मध्यरक्षक रॉवलिन बोर्जिस व लिस्टन कुलासो यांचा समावेश स्टिमॅक यांनी केला आहे. आयएसएल स्पर्धेत सेरिटन, आदिल एफसी गोवातर्फे, मंदार व रॉवलिन मुंबई सिटीतर्फे, तर लिस्टन हैदराबाद एफसीतर्फे खेळतो. सेरिटन व आदिल यांच्याव्यतिरिक्त संभाव्य संघात गोलरक्षक धीरज सिंग व आघाडीपटू ईशान पंडिता यांनाही संधी मिळाली आहे.

गोव्याचे नेतृत्व अष्टपैलू शिखाकडे; सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी संघ जाहीर

यापूर्वी स्पेनमध्ये व्यावसायिक फुटबॉल खेळलेल्या पंडिताची प्रथमच राष्ट्रीय संभाव्य संघात निवड झाली आहे. भारताचे सामने अनुक्रमे 25 व 29 मार्च रोजी दुबई येथे खेळले जातील. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धा संपल्यानंतर दोन्ही सामन्यांसाठी भारताचा 28 सदस्यीय संघ जाहीर केला जाईल. आयएसएल अंतिम सामना 13 मार्च रोजी खेळला जाईल, त्यानंतर 15 मार्चपासून भारतीय संघाचे दुबई येथे सराव शिबिर होईल. नोव्हेंबर 2019 नंतर भारतीय संघ प्रथमच आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळणार आहे.

या खेळाडूने अश्विनला म्हटले ‘टीम इंडियाचा रॉकस्टार’

संबंधित बातम्या