गोव्यातील फुटबॉलमध्ये सोळा वर्षांपूर्वी फिक्सिंग

किशोर पेटकर
रविवार, 9 ऑगस्ट 2020

गोलांचा पाऊस पडलेल्या दोन्ही सामन्यांतील निकाल संशयास्पद होते.

पणजी

गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेच्या २०१९-२० मोसमातील सहा सामन्यांच्या निकालाबाबत आशियाई फुटबॉल महासंघाने संशय व्यक्त केल्यानंतर गोवा फुटबॉल असोसिएशनने (जीएफए) समिती नेमून सखोल चौकशी करण्याचे ठरविले आहे. इतिहासात डोकावतागोव्यातील फुटबॉलमध्ये सोळा वर्षांपूर्वीही फिक्सिंगची किड आढळली होती.

जीएफएच्या २००३-०४ मोसमात फेब्रुवारी २००४ मध्ये द्वितीय विभागीय फुटबॉल स्पर्धेत कथित सामना निकाल निश्चितीचे प्रकरण घडले होतेत्याबद्दल तेव्हा चार संघांवर कारवाईही केली होती. दोन सामन्यांत तब्बल ११८ गोलांचा पाऊस पडल्यानंतर साऱ्यांच्याच भूवया उंचावल्या होत्या. द्वितीय विभागीय आंतरविभाग प्ले-ऑफ फेरीतील दोन सामने वादग्रस्त ठरले होते. तेव्हा चिंचोणे येथील मैदानावर कुडतरी जिमखान्याने सांगोल्डा लाईटनिंग संघावर ६१-१ असातर धुळेर-म्हापसा येथे विलरेड लीझर स्पोर्टस क्लबने दोना पावला स्पोर्टस क्लबवर ५५-१ फरकाने मोठा विजय प्राप्त केला होता. विलरेड लीझर संघाच्या विजयात प्रतिस्पर्ध्यांचे चार स्वयंगोल होते. दोन्ही सामने एकाच दिवशी झाले होते.

गोलांचा पाऊस पडलेल्या दोन्ही सामन्यांतील निकाल संशयास्पद होते. जीएफएने दोन्ही सामन्यांचे निकाल निलंबित करत व्यवस्थापकीय समितीची विशेष बैठकही घेतली होती. जीएफएने कुडतरी जिमखानासांगोल्डा लाईटनिंगविलरेड लीझर आणि दोना पावला या चारही संघांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलेतसेच दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. चारही क्लबांवरील कारवाई जीएफएच्या नियमावलीनुसार झाल्याचे सांगण्यात आले. या क्लबांच्या व्यवस्थापकीय आणि कार्यकारी समितीतसेच खेळाडूंवरील पुढील कारवाईसाठी प्रकरण जीएफए आमसभेकडे सोपविण्यात आले होते. या चारही संघांचे द्वितीय विभागीय स्पर्धेतील आंतरविभाग सामन्यांचे निकालही रद्दबातल ठरविण्यात आले.

गोव्यातील फुटबॉल इतिहासात संघांकडून खेळासाठी लाजिरवाणी आणि बदनाम करणारी घटना प्रथमच घडल्याची प्रतिक्रिया जीएफएचे तत्कालीन सचिव सावियो मसायस यांनी तेव्हा दिली होती.

 सरस गोलसरासरीसाठी फिक्सिंग

गोलसरासरी सरस ठरावी याउद्देशाने सोळा वर्षांपूर्वी फिक्सिंग घडल्याचा दावा झाला होता. प्रथम विभागीय स्पर्धेस पात्र ठरण्यासाठी विलरेड लीझर क्लबला मोठ्या विजयाची गरज होती. हे फिक्सिंग पैशांसाठी नव्हेतर गुणतक्त्यात वरचढ राहण्यासाठी झाल्याचे सांगण्यात आले होते. प्ले-ऑफ फेरीत अव्वल ठरणारा संघ प्रथम विभागीय स्पर्धेस पात्र ठरणार होता. त्यामुळे कुडतरी जिमखाना व विलरेड लीझर क्लब यांच्यात चुरस होती.

संपादन- अवित बगळे

 

संबंधित बातम्या