कसोटी पाठोपाठ टीम इंडियाने घेतली टी-20 मध्ये झेप

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 10 मार्च 2021

टीम इंडिया कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानावर असून एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.

नवी दिल्ली: आयसीसीने जारी केलेल्या टी-20 रॅंकिगमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने चक्क दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. टीम इंडिया कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानावर असून एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत न्यूझीलंडकडून 3-2 ने पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ तिसऱ्या स्थानावर घसरला असून भारतापेक्षा एका गुणाने मागे राहिला आहे. इंग्लंड सध्या पहिल्या स्थानावर असून भारतापेक्षा तो सात गुणांनी पुढे आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या कसोटी मालिकेनंतर लवकरच पाच सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. यावेळी भारताला टी-20 मालिकेत इंग्लंडला पाठीमागे टाकून पहिल्या क्रमांकावर येण्याची संधी आहे.

विराटvsबाबर: पाकिस्तानी खेळाडू कोहली-बाबरच्या तुलनेवरून का भडकला?

दरम्यान टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंच न्यूझीलंड विरुध्द पार पडलेल्या टी-20 सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केल्यामुळे तो दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. मात्र भारतीय वेगवान फलंदाज के.एल राहुलचे स्थान पहिल्या क्रमांकावरुन तिसऱ्या क्रंमाकावर घसरले आहे. तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सहाव्या स्थानावर कायम आहे. मात्र टी-20 अष्टपैलू खेळाडूंच्या रॅंगिकमध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. तर अफगाणिस्तानचा गोलंदाज रशीद खान गोलंदाजाच्या रॅंकिगमध्ये पहिल्या स्थानावर आहे.   

संबंधित बातम्या