चाहत्यांविना फुटबॉल अपूर्ण : सेरिटन

किशोर पेटकर
गुरुवार, 16 जुलै 2020

शानदार कामगिरीमुळे सेरिटनला भारताच्या संभाव्य संघ शिबिरातही स्थान मिळाले.

पणजी

चाहत्यांविना फुटबॉल अपूर्णच आहे, पण कोविड-१९ मुळे उद्‍भवलेल्या परिस्थितीस समजून घ्यायला हवे, असे मत एफसी गोवाचा बचावपटू सेरिटन फर्नांडिंस याने व्यक्त केले.

‘एफसी गोवा फॅन क्लब’सोबतच्या सोशल मीडियावरील थेट संवादात सेरिटन याने भावना व्यक्त केल्या. राईट-बॅक जागी खेळणारा सेरिटन गतमोसमात एफसी गोवाच्या बचावफळीत उल्लेखनीय ठरला होता. त्याने राष्ट्रीय प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनाही प्रभावित केले. शानदार कामगिरीमुळे सेरिटनला भारताच्या संभाव्य संघ शिबिरातही स्थान मिळाले.

सेरिटन याने सांगितले, की ‘‘चाहत्यांविना फुटबॉलचा आनंद लुटता येत नाही. चाहते जोरदार पाठिंबा देत असताना खेळणे मला प्रेरित करते.’’ राष्ट्रीय शिबिरासाठी संधी मिळणे ही आयुष्यातील मोठी घटना असल्याचेही त्याने नमूद केले. गोव्यात स्टिमॅक यांच्याशी झालेल्या भेटीविषयी सेरिटनने सांगितले, की ‘‘त्यांनी माझी शैली आणि खेळ आवडत असल्याचे सांगून अथक मेहनत घेण्याचा सल्ला दिला. बचाव आणि आक्रमण याविषयी त्यांनी काही सूचनाही केल्या.’’

एफसी गोवाचा नवोदित युवा बचावपटू लिअँडर डिकुन्हा याने मुख्य संघापर्यंत मजल मारल्याबद्दल सेरिटन याने आनंद व्यक्त केला.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या