आशियाई पात्रता स्पर्धेसाठी प्रिन्सटनची निवड

भारताच्या २३ वर्षांखालील फुटबॉल संघात एकमेव गोमंतकीय फुटबॉलपटू
आशियाई पात्रता स्पर्धेसाठी प्रिन्सटनची निवड
फुटबॉलपटू प्रिन्सटन रिबेलोदैनिक गोमन्तक

पणजी: उझबेकिस्तानमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या 23 वर्षांखालील आशिया करंडक फुटबॉल (Asia Cup Football Tournament) स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात मध्यरक्षक प्रिन्सटन रिबेलो एकमेव गोमंतकीय खेळाडू आहे. स्पर्धेच्या पात्रता फेरीत भारतीय संघ ई गटात खेळेल.

फुटबॉलपटू प्रिन्सटन रिबेलो
फुटबॉल वर्ल्डकपच्या क्वालिफायर सामन्यात चाहते अन् पोलिसांमध्ये वादावादी

भारताच्या गटात ओमान, किर्गिझ प्रजासत्ताक व यजमान संयुक्त अरब अमिराती यांचा समावेश आहे. गटातील सर्व सामने 25 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत अमिरातीतील फुजैरा येथे खेळले जातील. ओमानविरुद्ध 25 रोजी, संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध 28 रोजी, तर किर्गिझ प्रजासत्ताकाविरुद्ध 31 रोजी सामना होईल. भारतीय संघ 17 रोजी बंगळूर येथे जमा होईल आणि 20 रोजी अमिरातीस रवाना होईल.

प्रिन्सटन 22 वर्षांचा असून 2019 पासून तो एफसी गोवाचे प्रतिनिधित्व करत आहे. आतापर्यंत त्याने 25 आयएसएल सामन्यांत एफसी गोवाचे प्रतिनिधित्व केले आहे. हल्लीच ड्युरँड कप स्पर्धेत विजेतेपद मिळविलेल्या एफसी गोवासाठी त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.

फुटबॉलपटू प्रिन्सटन रिबेलो
'धोनी है बडे दिल वाला', BCCI अध्यक्षांची 'माही'वर स्तुतीसुमने

भारतीय संघ:

गोलरक्षक: धीरजसिंग मोईरांगथेम, प्रभसुखनसिंग गिल, प्रतीककुमार सिंग, महंमद नवाझ, बचावपटू: नरेंद्र गेहलोत, बिकाश युमनाम, आलेक्स साजी, होर्मिपाम रुईवा, हॅलेन नोंगडू, आशिष राय, सुमीत राठी, आकाश मिश्रा, साहिल पनवार, मध्यरक्षक: एसके साहिल, सुरेश सिंग, अमरजित सिंग, लालेंगमाविया, जीक्सन सिंग, दीपक टांग्री, राहुल केपी, कोमल थाटल, निखिल राज, ब्राईस मिरांडा, प्रिन्सटन रिबेलो, आघाडीपटू: विक्रम प्रताप सिंग, रहीम अली, रोहिन दानू, अनिकेत जाधव.

Related Stories

No stories found.