FIFA World Cup विजयाचं कौतुक! Messi कडून जगज्जेत्या अर्जेंटिना टीमसाठी सोन्याचे आयफोन गिफ्ट, Photo Viral

फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेचे विश्वविजेतेपद जिंकणाऱ्या अर्जेंटिना संघासाठी मेस्सीने खास सोन्याचा मुलामा असलेले आयफोन बनवून घेतले आहेत.
Lionel Messi | Golden IPhone
Lionel Messi | Golden IPhoneDainik Gomantak

Lionel Messi orders 35 gold iPhones: अर्जेंटिना फुटबॉल संघासाठी 18 डिसेंबर 2022 ही तारीख खूप खास आहे. त्यांनी याच दिवशी दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली कतारमध्ये झालेल्या फिफा वर्ल्डकप 2022 ट्रॉफीवर नाव कोरत 36 वर्षांच्या विश्वविजेतेपदाचा दुष्काळ संपवला होता. दरम्यान, या विश्वविजेतेपदाची आठवण म्हणून आता मेस्सीने संघसहकारी आणि स्टाफला खास गिफ्ट मागवले आहे.

मेस्सीसाठी हा वर्ल्डकप विजय खूप खास आहे. त्याचा हा कारकिर्दीतील पाचवा वर्ल्डकप होता आणि त्यात त्याला अखेर विश्वविजेतेपद जिंकण्यात यश आले. त्यामुळे त्याचे वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

Lionel Messi | Golden IPhone
Lionel Messi Video: 'चला, मुलांनो झोपायची वेळ झाली...', FIFA Award स्विकारताच मेस्सीचा लेकांना स्पेशल मेसेज

त्याचमुळे त्याने फिफा वर्ल्डकप 2022 विजेत्या अर्जेंटिना संघातील प्रत्येक सदस्यासाठी आणि सपोर्ट स्टाफसाठी मिळून 35 सोन्याचा मुलामा असलेले आयफोन मागवले आहेत.

द सनने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार या आयफोनसाठी 24 कॅरेट सोने वापरण्यात आले आहे. तसेच या आयफोनची एकूण किंमत 175,000 पाउंड म्हणजे भारतीय चलनानुसार साधारण 1.73 कोटी रुपये आहे.

तसेच या आयफोनवर खेळाडूंचे नाव, जर्सी क्रमांक आणि अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनचा लोगो कोरण्यात आला आहे. हे आयफोन पॅरिसमध्ये मेस्सीच्या अपार्टमेंमध्ये डिलिव्हर करण्यात आले आहेत.

तसेच सुत्रांनी सांगितले आहे की मेस्सीला त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण साजरा करायचा होता. त्यामुळे त्याने उद्योजक बेन लियोन्सशी संपर्क केला आणि त्यांनी एक डिझाईन तयार केले.

आय डिझाईनचे सीएओ बेन यांनी म्हटले आहे की 'मेस्सी फक्त दिग्गज नाही, तर तो आय डिझाईन गोल्डचा सर्वात प्रामाणिक ग्राहक देखील आहे. वर्ल्डकप फायनलनंतर काही महिन्यांनी तो भेटला. त्याने सांगितले की त्याला सर्व खेळाडूंना आणि स्टाफला देण्यासाठी खास गिफ्ट हवे आहे, पण त्याला घड्याळासारखे सर्वसाधारण गिफ्ट नको होते. त्यामुळे मी त्याला सोन्याचा मुलामा असलेल्या आयफोनबद्दल सांगितले आणि त्याला ही कल्पना आवडली.'

Lionel Messi | Golden IPhone
Lionel Messi @700: मेस्सीने रचला मोठा रेकॉर्ड, रोनाल्डोपेक्षा 104 सामने कमी खेळत केला विक्रमी गोल

अर्जेंटिनाचा तिसरा विश्वविजय

फिफा वर्ल्डकप 2022 मधील विजय हा अर्जेंटिनाचा एकूण तिसरा विश्वविजय होता. यापूर्वी त्यांनी 1978 आणि 1986 साली वर्ल्डकप जिंकला होता. वर्ल्डकप 2022 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सला पेनल्टी शुटआऊटमध्ये 4-2 अशा फरकाने पराभूत करत या विश्वविजेतेपदावर नाव कोरले होते. या सामन्यात मेस्सीने 2 महत्त्वपूर्ण गोल केले होते.

मेस्सी सर्वोत्तम खेळाडू

मेस्सी फिफा वर्ल्डकप 2022 मधील अर्जेंटिनासाठी महत्त्वाचा खेळाडूही ठरला. त्याने या स्पर्धेत एकूण 7 गोल आणि 3 असिस्ट केले. त्यामुळे त्याला या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा गोल्डन बॉल पुरस्कारही मिळाला. हा पुरस्कार दोनवेळा जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरला. यापूर्वी त्याने 2014 साली झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेतही हा पुरस्कार जिंकला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com