भारतातातील फुटबॉल वर्ल्डकप दुसऱ्यांदा लांबणीवर?

क्रीडा प्रतिनिधी
रविवार, 20 सप्टेंबर 2020

Football World Cup in India postponed for the second time

मुंबई: भारताला प्रथम मिळालेल्या १७ वर्षांखालील महिलांची विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा दुसऱ्यांदा लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. या महिन्याअखेरीला हा निर्णय अपेक्षित आहे.

कोरोनाचा धोका कायम असल्यामुळे या स्पर्धेसाठी आवश्‍यक असलेले पात्रता सामने अजून पूर्ण झालेले नाही. ते कधी सुरू होतील याबाबतही साशंकता आहे, त्यामुळे भारतात होणारी मुख्य स्पर्धा लांबणीवर टाकण्याशिवाय फिफासमोर पर्याय नसेल, असे सांगण्यात येत आहे.

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ही स्पर्धा नोव्हेंबर २०२० मध्ये होणार होती. सलामी आणि अंतिम सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार होते. परंतु कोरोनाचा धोका जगभरात सुरू झाल्यानंतर ही स्पर्धा २०२१ फेब्रुवारी-मार्चपर्यंत लांबणीवर टाकण्यात आलेली आहे. स्पर्धेला आता सहा महिन्यांचाच कालावधी शिल्लक राहिलेला आहे आणि अजूनही काही पात्रता सामने शिल्लक आहेत. खेळाडू तसेच स्पर्धेशी निगडित असलेल्या सर्वांचे आरोग्य आणि सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे फिफाही सावधगिरी बाळगत आहे. भारतीय फुटबॉल संघटना आणि सामने होणाऱ्या स्थानिक घटकांशी फिफाचे सदस्य परिस्थितीचा आढवा घेत आहेत.

संबंधित बातम्या