FIFA World Cup Matches In Inox: थिएटरमध्ये फुटबॉल वर्ल्डकपचा थरार; गोव्यासह 'या' शहरांत आयनॉक्स करणार Live स्क्रीनिंग

2 डिसेंबरपासून स्पर्धेतील नॉकआऊट राऊंडला सुरवात
FIFA World Cup Matches In Inox
FIFA World Cup Matches In InoxDainik Gomantak

FIFA World Cup Matches Watch In Inox: फिफा फुटबॉल वर्ल्डकपचा थरार 20 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. देशतील फुटबॉलप्रेमींना हा थरार मोठ्या पडद्यावर अनुभवता यावा यासाठी देशातील आघाडीची मल्टीप्लेक्स चेन असलेल्या आयनॉक्स लीजर लिमिटेडने बुधवारी मोठी घोषणा केली.

FIFA World Cup Matches In Inox
First Women Referee In FIFA World Cup: फ्रान्सच्या स्टेफनीने रचला इतिहास; फुटबॉल वर्ल्डकपमध्ये बनली पहिली महिला रेफ्री

आयनॉक्स आपल्या थिएटर्समध्ये फुटबॉल वर्ल्डकपमधील सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण करणार आहे. देशातील 15 शहरांमधील 22 मल्टीप्लेक्सेसमध्ये आयनॉक्स लाईव्ह मॅचेस दाखवणार आहे. फुटबॉलप्रेमींना मुंबई, दिल्ली, गुरुग्राम, कोलकाता, पुणे, गोवा, भुवनेश्वर, जयपुर, सिलीगुड़ी, सूरत, इंदूर, बडोदा, धनबाद आणि त्रिशूर येथील आयनॉक्स मल्टीप्लेक्समध्ये सामने पाहता येणार आहेत.

2 डिसेंबरपासून स्पर्धेतील नॉकआऊट राऊंडला सुरवात होत आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे. स्पर्धेत एकुण 32 संघांचा समावेश आहे.

FIFA World Cup Matches In Inox
Abu Dhabi T10 League 2022: अबु धाबी टी10 लीगमध्ये खेळणार 'हे' 5 माजी भारतीय क्रिकेटपटू

आयनॉक्स लीजर लिमिटेडचे सीईओ आलोक टंडन म्हणाले, "आम्ही आमच्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहोत. काही गोष्टी देशातील लोकांना एकत्र आणतात. त्यामध्ये खेळाचाही समावेश आहे. आम्ही आयनॉक्सच्या मोठ्या पडद्यावर सर्वात मोठा क्रीडा इव्हेंट असलेल्या फिफा वर्ल्डकपमधील सामन्यांचे आयोजन करण्यासाठी खूप एक्साईट आहोत.

दरम्यान, आयनॉक्सने यापुर्वी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या पुरूषांच्या टी-20 वर्ल्ड कपमधील सर्व सामने थिएटरमध्ये दाखवले होते. त्यासाठी आयनॉक्सने आयसीसीसोबतही करार केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com