Ronaldo-Neymar: स्टार फुटबॉलर रोनाल्डो-नेमारकडे अनेक महागड्या कारचे मालक, पाहा Car Collections

रोनाल्डो आणि नेमार या दोघांनाही विविध कारचे आकर्षण असून त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत.
Cristiano Ronaldo and Neymar jr. Car Collection
Cristiano Ronaldo and Neymar jr. Car CollectionDainik Gomantak
Published on

Cristiano Ronaldo and Neymar jr.: फुटबॉलमध्ये 5 फेब्रुवारी ही तारीख महत्त्वाची आहे, कारण याच दिवशी दोन दिग्गज खेळाडूंचा वाढदिवस असतो. पोर्तुगालचा स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि ब्राझीलचा फुटबॉलर नेमार ज्यूनियर यांचा एकाच दिवशी म्हणजे 5 फेब्रुवारीला वाढदिवस असतो.

रोनाल्डो आज त्याचा 38 वा आणि नेमार 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. दरम्यान वाढदिवस आणि फुटबॉलवरील प्रेमाव्यतिरिक्त आणखी एक गोष्ट या दोघांच्याबाबतीत सारखी आहे, ती म्हणज त्यांना असलेले लक्झरी कारचे आकर्षण. रोनाल्डो आणि नेमार यांच्याकडे अनेक महागड्या कार आहेत. त्या कारवरच एक नजर टाकू.

रोनाल्डोकडे असलेल्या महागड्या कार-

Lamborghini Aventador LP 700-4
Lamborghini Aventador LP 700-4Dainik Gomantak

1. लँबोर्गिनी ऍवेन्टोडोर एलपी 700-4 (Lamborghini Aventador LP 700-4)

रोनाल्डोकडे असलेल्या अनेक महागड्या कारपैकी लँबोर्गिनी ऍवेन्टोडोर एलपी 700-4 ही देखील आहे. ही कारण जवळपास 340,000 डॉलरची असल्याचे म्हटले जाते. ती वेगवान कारपैकी एक असून जवळपास 350 किमी प्रति तास वेगाने धावते.

McLaren Senna
McLaren SennaDainik Gomantak

2. मॅकलॅरेन सेना (McLaren Senna)

रोनाल्डोने मॅकलॅरेन सेना ही लक्झरी कार 2019 मध्ये घेतली होती. या मॉडेलच्या केवळ 500 कार बनवण्यात आल्या होत्या, त्यातील एक कार रोनाल्डोकडे आहे. त्याने यासाठी जवळपास 1.43 मिलियन डॉलर मोजले होते.

Bugatti Centodieci
Bugatti CentodieciDainik Gomantak

3. बुगाटी सेन्टोडिसी (Bugatti Centodieci)

रिपोर्ट्सनुसार रोनाल्डोकडे बुगाटीच्या वेगवेगळ्या मॉडेलच्या कार आहेत. त्यातील एक बुगाटी सेन्टोडिसी आहे. महत्त्वाचे म्हणजे या मॉडेलच्या केवळ 10 कारच बनवण्यात आल्या होत्या. या कारचा वेग जवळपासल 377 किमी प्रति तास आहे.

Bugatti Chiron
Bugatti ChironDainik Gomantak

4. बुगाटी शिरॉन (Bugatti Chiron)

बुगाटी शिरॉन ही कार रोनाल्डोने 2017 साली घेतली होती. त्याने CR7 असे त्याच्या कारवर लिहिलेले देखील आहे. जवळपास 3 मिलियन डॉलर इतकी कारची किंमत आहे.

Bugatti Veyron
Bugatti VeyronDainik Gomantak

5. बुगाटी वेरॉन (Bugatti Veyron)

रोनाल्डोने 2018 मध्ये स्वत:लाच बुगाटी वेरॉन कार भेट दिली होती. जवळपास 1.7 मिलियन डॉलरची ही कार असून त्याने ही कार चॅम्पियन्स लीगमध्ये लिव्हरपूलला रियल मद्रिदने पराभूत केल्यानंतर घेतली होती.

Mercedes G-Wagon Brabus
Mercedes G-Wagon BrabusDainik Gomantak

6. मर्सिडिज जी-वॅगन ब्राबस (Mercedes G-Wagon Brabus)

रोनाल्डोच्या 35 व्या वाढदिवसाला त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रोड्रिगेजने त्याला मर्सिडिज जी-वॅगन ब्राबस कार भेट दिली होती. कार जवळपास 850,000 डॉलरची आहे.

Rolls Royce
Rolls RoyceDainik Gomantak

7. रोल्स रॉयस (Rolls Royce)

जॉर्जिनानेच 2022 मध्ये ख्रिसमसनिमित्त रोनाल्डोला रोल्स रॉयल ही महागडी कार सरप्राईज गिफ्ट म्हणून दिली होती.

नेमारकडे असलेल्या महागड्या कार-

Ferrari 458 Italia
Ferrari 458 ItaliaDainik Gomantak

1. फेरारी 458 इटालिया (Ferrari 458 Italia)

नेमारला फेरारी कार आवडतात. त्याच्याकडे फेरारीचे 458 इटालिया मॉडेल आहे. या कारची किंमत जवळपास 4.34 कोटी रुपये आहे.

Lamborghini Veneno
Lamborghini VenenoDainik Gomantak

2. लँबोर्गिनी वेनेनो (Lamborghini Veneno)

वेगवान कारपैकी असलेली लँबोर्गिनी वेनेनो कारही नेमारकडे आहे. त्याने या कारबरोबर काही फोटोही शेअर केले आहेत. त्याच्याकडे असलेल्या या कारची किंमत जवळपास 45 कोटी रुपये आहे.

Lykan Hypersport
Lykan HypersportDainik Gomantak

3. लायकन हायपरस्पोर्ट (Lykan Hypersport)

नेमारकडे लायकन हायपरस्पोर्ट ही महागडी कार देखील आहे. जवळपास 26 कोटी रुपयांची असलेल्या या कारचा वेगळ 295 किमी प्रतितास इतका आहे.

Koenigsegg CCXR Trevita
Koenigsegg CCXR TrevitaDainik Gomantak

4. कोइनिग्सेग सीसीएक्सआर ट्रेविटा (Koenigsegg CCXR Trevita)

नेमारने जवळपास 35 कोटी रुपयांची असलेली कोइनिग्सेग सीसीएक्सआर ट्रेविटा कार घेतली आहे. या कारच्या लाँचनंतर लगेचच घेणाऱ्या काही मोजक्या लोकांपैकी नेमार होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com