T20 World cup: आयसीसीने पहिल्यांदाच 'या' नियमाला दिला ग्रीन सिग्नल!

आयसीसीने (ICC) डावादरम्यान संघाला दोन डीआरएस देण्याची परवानगी दिली आहे.
T20 World cup: आयसीसीने पहिल्यांदाच 'या' नियमाला दिला ग्रीन सिग्नल!
Field umpireDainik Gomantak

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) या महिन्यात बीसीसीआय आयोजित होणाऱ्या यूएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या आयसीसी टी-ट्वेन्टी विश्वचषकाबाबत (T20 World cup) मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या वेळी होणाऱ्या या छोट्या फॉरमॅटच्या मोठ्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा DRS चा वापर करण्यात येणार आहे. आयसीसीने डावादरम्यान संघाला दोन डीआरएस देण्याची परवानगी दिली आहे.

2016 नंतर प्रथमच खेळल्या जात असलेल्या आयसीसी टी -20 विश्वचषक स्पर्धेची सुरुवात 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. आयसीसीने पहिल्यांदाच सामन्यादरम्यान डीआरएस नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार एका संघाला डावादरम्यान 2 डीआरएस घेण्याचा अधिकार दिला जाईल असे सांगण्यात आले आहे.

Field umpire
ICC T20 World Cup 2021: भारतीय संघ नव्या जर्सीत दिसणार?

कर्णधारांना विशेष अधिकार असेल

कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये क्षेत्रीय अंपायरने दिलेल्या निर्णयाला कर्णधार डीआरएसच्या माध्यमातून आव्हान देतो त्या प्रकारे त्याला आता हा अधिकार वर्ल्ड कप दरम्यान देखील असणार आहे. सामना खेळणाऱ्या दोन्ही संघांच्या कर्णधाराला डावादरम्यान दोन वेळा फील्ड अंपायरच्या निर्णयाला आव्हान देण्याचा अधिकार असणार आहे. दरम्यान, टीव्ही अंपायरने निर्णय बदलला तर डीआरएस अबाधित राहील, मात्र जर निर्णय कर्णधाराच्या बाजूने नसेल तर तो तो गमावेल.

Field umpire
T20 World Cup: सामन्याचा आंनद आता मैदानातून, BCCIची परवानगी

डीआरएस काय आहे?

आयसीसीने फील्ड अंपायरकडून खेळाडूंना आऊट देण्यासंदर्भातील चूक सुधारण्यासाठी डीआरएसचा नियम केला होता. जर फील्ड अंपायरने संघातील खेळाडूंकडून करण्यात आलेली अपील न मानल्यास त्याच दरम्यान कर्णधाराला वाटले की, हे आऊट देणे आपेक्षित होते, अशा परिस्थितीत कर्णधार डीआरएसची मागणी करु शकतो. त्यानंतर निर्णय थर्ड अंपायरकडे जातो. रिप्ले पाहिल्यानंतर, थर्ड अंपायर खेळाडू आऊट आहे की नाही हे ठरवतात. त्याचप्रमाणे, जर फलंदाजाला असे वाटत असेल की, अंपायरने त्याला चुकीचे आउट दिले आहे, तर तो DRS ची मागणी देखील करु शकतो.

Related Stories

No stories found.