Former Australia Captain: ऑस्ट्रेलियाच्या 'या' दिग्गज क्रिकेटपटूने घेतला मोठा निर्णय, निवृत्तीची केली घोषणा!

Tim Paine Retirement: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आजपासून भारतात सुरु झाली आहे.
Tim Paine
Tim PaineDainik Gomantak

Tim Paine Retirement: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आजपासून भारतात सुरु झाली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या एका अनुभवी खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे.

ऑस्ट्रेलियन संघाचा कसोटी फॉरमॅटचा कर्णधार असलेल्या टीम पेनने शुक्रवारी निवृत्ती जाहीर केली. क्वीन्सलँड विरुद्ध तस्मानियाच्या शेफिल्ड शिल्ड प्रथम श्रेणी सामन्यानंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली.

दरम्यान, ऑस्ट्रेलियासाठी (Australia) यष्टिरक्षक फलंदाज असलेल्या टीम पेनने (Tim Paine) आपल्या देशासाठी एकूण 35 कसोटी सामने खेळले. त्याने 2018 ते 2021 या कालावधीत 23 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्वही केले.

2018 साली दक्षिण आफ्रिकेतील बॉल टॅम्परिंग प्रकरणात स्टीव्ह स्मिथला कर्णधारपद गमवावे लागले होते. या घटनेनंतर टीम पेनला ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार बनवण्यात आले होते.

Tim Paine
India vs Australia: कांगारुंना धक्का! कमिन्स ODI सिरीजलाही मुकणार; 'हा' खेळाडू करणार 'कॅप्टन्सी'

तथापि, टीम पेनने 2021 मध्ये कसोटी कर्णधारपदाचा निरोप घेतला, जेव्हा त्याच्याशी संबंधित एक वाद चर्चेत आला होता. वास्तविक, त्याने क्रिकेट तस्मानियाच्या एका माजी कर्मचाऱ्याला आक्षेपार्ह मेसेज पाठवला होता, त्यानंतर वाद वाढला होता.

तसेच, टीम पेनने 2010 मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. टीमने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत कसोटी सामन्यांमध्ये 32.63 च्या सरासरीने धावा केल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या 92 धावांची होती. पेनने विकेटच्या मागे 157 खेळाडूंचे झेल घेतले आणि स्टंप उडवले. याशिवाय, टीम पेनने ऑस्ट्रेलियाकडून 35 एकदिवसीय सामनेही खेळले आहेत.

Tim Paine
India vs Australia: टीम इंडियाने जिंकली बॉर्डर-गावसकर ट्रॉफी! फलंदाजांच्या वर्चस्वानंतर अहमदाबाद कसोटी 'ड्रॉ'

त्याचबरोबर, इंग्लंडमध्ये (England) ऍशेस मालिकेत टीम पेन हा स्टिव वॉनंतर पराभूत न होणारा ऑस्ट्रेलियाचा पहिला कर्णधार ठरला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com