ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू म्हणतो विराटचे बाळ ऑस्ट्रेलियात जन्माला यावे, कारण....

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

महान क्रिकेटर अॅलन बॉर्डर हे देखील त्याच्या फॅन्सच्या यादीत जोडले गेले आहेत. बॉर्डर-गावस्कर चषकाच्या पूर्वी त्यांनी विराटची प्रशंसा केली आहे.   

भारतीय क्रिकेट संघाचाा कर्णधार विराट कोहलीच्या मैदानावरील व्यक्तीमत्वामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये तो कायमच चर्चेत असतो. त्याच्या शैलीकडे बघून कोणीही त्याचा फॅन होईल यात शंका नाही. एकेकाळचा महान क्रिकेटर अॅलन बॉर्डर हे देखील त्याच्या फॅन्सच्या यादीत जोडले गेले आहेत. बॉर्डर-गावस्कर चषकाच्या पूर्वी त्यांनी विराटची प्रशंसा केली आहे.   

गंमतीच्या स्वरात बोलताना विराटला ऑस्ट्रेलियाचा रंग असलेल्या जर्सीमध्ये बघायचे आहे, असे ते म्हणाले. विराटच्या पुत्राबद्दलही गंमतीत बोलताना ते म्हणाले की, 'विराटने आपल्या होणाऱ्या मुलालाही ऑस्ट्रेलिया संघाशी जोडावे.' यावेळी विराटला सल्ला द्यायलाही ते विसरले नाहीत. त्याने होणाऱ्या मुलाला ऑस्ट्रेलियातच जन्म द्यावा, असा सल्ला बॉर्डर यांनी यावेळी दिला.  

बॉर्डर पुढे बोलताना म्हणाले,' मी विराटबरोबर क्रिकेट खेळणे पसंत करीन. त्याला ऑस्ट्रेलिया संघात खेळायचं असेल तर त्याचं स्वागत आहे. आम्ही तर इथपर्यंत विचार केलाय की, त्याने त्याच्या होणाऱ्या बाळाला ऑस्ट्रेलियातच जन्म द्यावा म्हणजे आम्ही उद्या तो ऑस्ट्रेलियन असल्याचा दावा करू शकू.' 
 
विराटच्या खेळण्याच्या शैलीबद्दल आणखीन काय म्हणाले बॉर्डर ?
'मला त्याची खेळण्याची शैली प्रचंड आवडते. मला खेळातील त्याची आक्रमकता आणि उत्साहही भावतो. जेव्हा तो मालिका अर्ध्यावर सोडून जाईल तेव्हा भारतीय संघ या गोष्टीला मुकेल. तो एक खास खेळाडू आहे, त्याच्याजवळ खास प्रतिभाही आहे. ज्याप्रमाणे भारतीचा संघ क्रिकेट खेळतो, तो अतिशय सकारात्मक आहे. कारण विराट संघाला सर्व बाजूने उत्तम लीड करतो. म्हणून मी त्याचा खूप मोठा फॅन आहे. ज्याप्रमाणे तो प्रकारच्या खेळासाठी आपल्या शैलीत बदल करतो. ते बघणे मला अत्यंत आवडते. तुम्ही जर भूतकाळात डोकावून पाहिले तर फक्त सुनील गावस्कर तसे इतर संघांसमोर खेळायचे.' 
 
भारतीय टीम ऑस्ट्रेलिया के साथ सीरीज़ खेलने के लिए वहां मौजूद है. 27 नवबंर से वनडे के साथ सीरीज़ का आगाज़ होगा. जिसके बाद तीन टी20 और चार टेस्ट मैच खेले जाएंगे. भारतीय कप्तान विराट कोहली पहले टेस्ट के बाद अपने बच्चे के लिए जन्म के लिए वापस भारत लौट आएंगे.
 भारतीय संघ ऑस्ट्रेलियाबरोबर मालिका खेळण्यासाठी दाखल झाला असून २७ नोव्हेंबरला एकदिवसीय सामन्याने दौऱ्याला प्रारंभ होईल. त्यानंतर भारतीय संघ टी-२० खेळणार आहे. या दोनही मालिका झाल्यावर खऱ्या अर्थाने कसोटी मालिकेला सुरूवात होईल. 

संबंधित बातम्या