Brian Booth Passed Away: क्रीडा जगतावर शोककळा, ऑस्ट्रेलियाच्या माजी कसोटी कर्णधाराचे दुःखद निधन

Brian Booth: क्रीडा विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू आणि हॉकी ऑलिंपियन ब्रायन बूथ यांचे निधन झाले.
Brian Booth Passed Away
Brian Booth Passed AwayDainik Gomantak

Brian Booth Passed Away: क्रीडा विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू आणि हॉकी ऑलिंपियन ब्रायन बूथ यांचे निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप उघड झालेले नाही.

दरम्यान, या धाकड खेळाडूने ऑस्ट्रेलियासाठी 29 कसोटी सामने खेळले, 2 सामन्यात त्याने कर्णधारपदही भूषवले.

ब्रायन बूथ मिडिल ऑर्डर बॅटर तसेच पार्ट टाइम स्पिनरही होते. 1960 च्या दशकाच्या सुरुवातीला बूथ हे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे महत्त्वाचे सदस्य होते. त्यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत पाच शतके झळकावली.

हॉकी आणि क्रिकेट या दोन्हीत ताकद दाखवली

ब्रायन बूथ यांनी वयाच्या 27 व्या वर्षी 1961 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. याआधी त्यांनी 1956 च्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये हॉकीमध्ये ऑस्ट्रेलियाचे (Australia) प्रतिनिधित्व केले होते. 2013 मध्ये द क्रिकेट मंथलीला दिलेल्या मुलाखतीत, बूथ म्हणाले होते की, दोन खेळ खेळण्याची संधी मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो.

Brian Booth Passed Away
IPL 2023 च्या धामधुमीत BCCI ची WTC Final साठी योजना तयार! तीन तुकड्यात टीम इंडिया निघणार दौऱ्यावर

ब्रायन बूथ यांची कसोटी क्रिकेट कारकीर्द

ब्रायन बूथ यांनी 29 कसोटीत 1773 धावा केल्या आणि तीन विकेट घेतल्या. ते शेवटचा सामना 1966 मध्ये खेळले होते. त्यांनी 5 शतके आणि 10 अर्धशतके केली होती. त्यांची सर्वोच्च धावसंख्या 169 होती.

दुसरीकडे, प्रथम श्रेणी क्रिकेटबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांनी 183 सामन्यात 45.42 च्या सरासरीने 11265 धावा केल्या. यादरम्यान 26 शतके आणि 60 अर्धशतके झाली.

Brian Booth Passed Away
WTC Final साठी टीम इंडियाची घोषणा! अजिंक्य रहाणेचं कमबॅक, तर सूर्या आऊट

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतके ठोकली

डिसेंबर 1962 मध्ये, घरच्या मैदानावर खेळताना, बूथ यांनी ब्रिस्बेन येथे इंग्लंडविरुद्ध 112 आणि 19* धावा केल्या. यानंतर मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या पुढच्या कसोटीत त्यांनी शतक झळकावले.

बूथ यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 शतके झळकावली होती, ज्याची सर्वाधिक चर्चा झाली होती. यामध्ये, ब्रिस्बेनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) पहिल्या कसोटीतील 169 आणि सिडनीतील पाचव्या कसोटीतील नाबाद 102 धावांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com