आयपीएल २०२१साठी चेन्नई्च्या कर्णधारपदी धोनी दिसणार नाही!

गोनमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

सर्व चाहत्यांना वेध लागले आहे ते २०२१ च्या आयपीएलचे. मात्र, आता धोनीच्या कर्णधार पदाबाबत एक मोठे विधान आले आहे. 

नवी दिल्ली- १५ ऑगस्टला संध्याकाळी धोनीच्या तमाम चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली होती. या दिवशी धोनीने आपल्या इंस्टाग्रॅम हँडलवरून धोनीने एक व्हिडिओ पोस्ट करत क्रिकेटमधून संन्यास घेत असल्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतर लगेचच आयपीएल सुरू झाल्याने धोनी मैदानावर आला आणि चाहत्यांचा आशा पुन्हा  पल्लवीत झाल्या. १ नोव्हेंबर रोजी धोनीने अशा प्रश्नाचं उत्तर देत धोनीने आणखी चाहत्यांना सुखावले. 

महेंद्रसिंह धोनीला सामन्यानंतर पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला की, तुझी ही शेवटची आयपीएल स्पर्धा आहे का?,  धोनीने यावर तात्काळ उत्तर देत 'डेफिनेटली नॉट' असे म्हटले. यानंतर धोनीच्या फॅन्सना त्याने खूश केले. सर्व चाहत्यांना वेध लागले आहे ते २०२१ च्या आयपीएलचे. मात्र, आता भारताचे माजी खेळाडू आणि धोनीचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी म्हटले आहे की, धोनी २०२१ ची आयपीएल खेळेल. मात्र, तो संघाच्या कर्णधार पदावर कायम राहणार नाही. स्टार स्पोर्टसच्या क्रिकेट शो कनेक्टिडमध्ये पूर्ण तर्क देऊन त्यांनी हे विधान केले आहे.

बांगर पुढे बोलताना म्हणाले, 'जेवढे मी धोनीला ओळखतो. तो २०११ विश्वचषकानंतरही हा विचार केला असेल की आता त्याने कर्णधार पदावर कायम रहावे की नाही.  मात्र, पुढे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौरा नसल्याने संघाला महत्वाचे सामने खेळायचे असल्याने त्याने कर्णधारपद सोडले नव्हते. त्यानंतर त्याने वेळ येताच विराट कोहलीच्या हाती कर्णधारपद देत एक खेळाडू म्हणून संघात खेळण्यास सुरूवात केली.     

धोनी नाही, मग कोण होणार सीएसकेचा कर्णधार? 

सीएसके संघातील खेळाडूंचा अंदाज घेतल्यास धोनी आता कर्णधारपदी कायम राहणार नसून तो आपल्याच संघातील खेळाडू आणि एक उत्तम फलंदाज फाफ डु प्लेसिस याच्या हाती कर्णधारपद सोपवून एक खेळाडू म्हणून संघात खेळत राहील, असे बांगर यांनी म्हटले आहे. 

संबंधित बातम्या