Roger Binny : ‘बीसीसीआय’ अध्यक्षांचा अखेरचा मोसम गोव्यातर्फे!

1991-92 मध्ये रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या दक्षिण विभागातील पाच सामन्यांत नेतृत्व
Roger Binny
Roger BinnyDainik Gomantak

Roger Binny : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नवे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि गोव्याचे आगळे नाते आहे. क्रिकेटपटू या नात्याने कारकिर्दीतील शेवटचा मोसम ते गोव्यातर्फे खेळले आणि तेव्हा कर्णधारपदही भूषविले होते. भारताच्या 1983 मधील विश्वकरंडक विजेत्या संघाचा प्रमुख सदस्य असलेल्या रॉजर बिन्नी यांनी 1975-76 मोसमात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

त्यानंतर 1991-92 मोसमानंतर सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून ते निवृत्त झाले. कारकिर्दीतील अखेरच्या मोसमात ते रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या दक्षिण विभागात गोव्यातर्फे खेळले. तेव्हा विभागात कमजोर मानल्या जाणाऱ्या गोव्याला बिन्नी यांच्या नेतृत्वाखाली पाचही लढतीत मोठ्या पराभवांना सामोरे जावे लागले, पण त्यांच्या उपस्थितीमुळे गोव्यासाठी तो मोसम संस्मरणीय ठरला.

एक शतक, दोन अर्धशतके

रॉजर बिन्नी कर्नाटकचे प्रमुख अष्टपैलू होते. मात्र स्पर्धात्मक क्रिकेटचा निरोप घेताना, अखेरच्या मोसमात त्यांनी गोव्याकडून 5 सामन्यांत 38.44च्या सरासरीने 346 धावा केल्या. यामध्ये एक शतक व दोन अर्धशतकांचा समावेश आहे. कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर गोलंदाजाची वेग मंदावल्यामुळे त्यांना मोठी किमया साधता आली नाही. गोव्याकडून त्यांच्या खात्यात तीन विकेट जमा झाल्या. 3 ते 6 नोव्हेंबर 1991 या कालावधीत कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर हैदराबादविरुद्धच्या रणजी सामन्यात बिन्नी यांनी दुसऱ्या डावात शानदार शतक (102) झळकावले. त्यानंतर केरळविरुद्ध दुसऱ्या डावात नाबाद 62, तर कर्नाटकविरुद्ध दुसऱ्या डावात 63 धावांची अर्धशतकी खेळी केली.

Roger Binny
BCCI, PCB चा वाद! आशिया चषकात तुम्ही नाही आले तर, विश्वचषकासाठी आम्ही नाही येणार

गोव्याकडून अभिनंदन

‘बीसीसीआय’च्या 91 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) प्रतिनिधित्व मावळते अध्यक्ष सूरज लोटलीकर यांनी केले. त्यावेळी बीसीसीआय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल 67 वर्षीय रॉजर बिन्नी यांचे लोटलीकर यांनी गोव्यातर्फे अभिनंदन केले व त्यांना अध्यक्षपद कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com